Google Maps Acciden Saam Tv
व्हायरल न्यूज

गुगल मॅपने पुन्हा गंडवलं, कार थेट खाडीत कोसळली, नवी मुंबईतील घटना

Google Maps Accident: नवी मुंबईतील महिलेला गुगल मॅपमुळे चुकीचा रस्ता मिळाला आणि तिची कार थेट खाडीत कोसळली. बेलापूर येथील सागरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गस्ती बोटीच्या मदतीने तिचा जीव वाचवला.

Tanvi Pol

Belapur Bridge Accident: तंत्रज्ञानाने प्रत्येकाचे आयुष्य अत्यंत सोपं केलं आहे, विशेषत म्हणजे गुगल मॅपसारखे नेव्हिगेशन अ‍ॅप्स रोजच्या प्रवासात मोठी मदत करतात. पण कधीकधी हेच मॅप चुकीचं मार्गदर्शन करतं आणि गंभीर अपघात घडवतात. सध्या अशीच एक थरारक घटना शुक्रवारी रात्री नवी मुंबईत घडली. गुगल मॅपवर भरवसा ठेवून जाणाऱ्या एका महिलेची कार थेट खाडीत कोसळली. सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिचा जीव वाचला.

नेमकी काय घडलं?

शुक्रवारी रात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना बेलापूर खाडीपुलाजवळ घडली. एक महिला तिच्या चारचाकी कारने उलवा परिसरातील एका ठिकाणी जात होती. रस्ते माहीत नसल्याने तिने गुगल मॅप(Google Map) सुरू करून दिशादर्शक घेतले. मात्र, बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालील मार्ग निवडला. गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले. मात्र तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर खाडीत कोसळली.

सागरी सुरक्षेचे वेळीच लक्ष

हा अपघात(Accident) रात्रीच्या अंधारात घडला असला तरी जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांना मोठा आवाज आणि पाण्यात उडालेला फवारा दिसला. त्यांनी त्वरित आपल्या बचाव पथकाला जागं केलं. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना महिला पाण्याच्या प्रवाहात वाहत जाताना दिसली. पोलिसांनी त्यांच्या गस्ती आणि रेस्क्यू बोटीच्या मदतीने थरारक पद्धतीने तिचा जीव वाचवला.

महिलेची प्रकृती स्थिर

बचावल्यानंतर संबंधित महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने, तिला फारशी दुखापत झाली नसून ती सुरक्षित आहे. तिच्या मानसिक स्थितीवर उपचार सुरू आहेत, कारण हा धक्का अत्यंत भयावह होता. ही घडलेली घटना पुन्हा एकदा दाखवते की गुगल मॅप्समधील त्रुटींचा धोका किती मोठा असू शकतो. अनेक लोक रात्रभर किंवा अपरिचित भागात प्रवास करताना पूर्णतः अ‍ॅपवर अवलंबून राहतात. मात्र, अचूकतेचा अभाव आणि स्थानिक माहितीचा अभाव या गोष्टी जीवघेण्या ठरू शकतात.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT