Heart attack viral video SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: बोलता बोलता अचानक खाली कोसळली महिला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Heart attack viral video: तेलंगणातील खम्मममध्ये गृहप्रवेश समारंभादरम्यान एका महिलेचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तेलंगणातील खम्मममध्ये एका गृहप्रवेश समारंभादरम्यान घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीये. यामध्ये 40 वर्षीय महिलेचा बोलता बोलता अचानक मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव सुष्मिता आहे. त्या आपल्या मैत्रिणीच्या नव्या घराच्या गृहप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान त्या त्यांची मैत्रीण आणि तिच्या पतीसोबत संवाद साधत होत्या. यावेळी त्या आनंदात फोटोही काढत होत्या. मात्र, याचवेळी अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.

ही संपूर्ण घटना त्याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता बोलत असताना अचानक तोल जाऊन पडताना दिसतात. त्या पडल्यानंतर उपस्थितांमध्ये गोंधळ उडाल्याचंही दिसून येतं.

घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. काहींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. एका युजरने 'ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे,' असं म्हटलंय. तर दुसऱ्याने 'जीवन किती अनिश्चित आहे, हे या घटनेतून स्पष्ट होतं,' अशी प्रतिक्रिया दिलीये. काहींनी या प्रकाराला अलीकडच्या काळात वाढलेल्या हार्ट अटॅकच्या घटनांशी जोडलंय.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हार्ट अटॅक कोणत्याही वयात आणि कोणत्याही परिस्थितीत येऊ शकतो. ज्यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्या व्यक्तींमध्ये अशा घटना अचानक घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि हेल्दी जीवनशैली जोपासली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT