Saam Tv
व्हायरल न्यूज

दुसऱ्यासोबत बायको OYO Hotel मध्ये, अचानक नवऱ्याची झाली एन्ट्री, धांदल उडताच बाल्कनीतून उडी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Wife With Lover Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक विश्वास न बसणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही काहीसा असाच आहे. नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Viral Video: एका हॉटेलमध्ये घडलेली ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या खास मित्रासोबत गुपचूपपणे हॉटेलमध्ये बर्थडे साजरा करत असतानाच अचानक तिचा पती आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन हॉटेलमध्ये पोहोचला. परिस्थितीने गोंधळून गेलेल्या महिलेने थेट हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळ काढल्याचा थरारक प्रकार घडला. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

महिला(Women) आपल्या खास मित्रासोबत ओयो हॉटेलमध्ये थांबली होती. त्या दिवशी तिचा वाढदिवस असल्याने तिने छोटं सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू त्या दरम्यान, तिच्या पतीला या सर्व गोष्टीची माहिती मिळाली. तो थेट आपल्या दोन लहान मुलांसह संबंधित हॉटेलमध्ये पोहोचला आणि हॉटेल स्टाफकडून रूमचा क्रमांक विचारून सरळ त्या रूमपर्यंत गेला. दार उघडल्यावर त्याला पत्नी दुसऱ्या एका पुरुषासोबत पाहून संताप अनावर झाला.

महिलेचा धक्कादायक निर्णय

पतीला अचानक हजर पाहताच महिला पूर्णपणे घाबरून गेली. कोणतीही परिस्थिती न पाहता तिने थेट हॉटेलच्या गॅलरीतून उडी मारली. सुदैवाने ती फार उंचावरून नव्हती, त्यामुळे फार मोठी इजा झाली नाही. मात्र ती लगेचच उठून जवळच्या गल्लीतून पळून गेली. हा सगळा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सध्या हा व्हिडिओ(Video) वाऱ्याच्या वेगाने देशभरात पोहचला असून तो व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ज्यात अनेकांनी संताप तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

Mumbai Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धमकीचा कॉल; रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकू!

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

SCROLL FOR NEXT