Navi Mumbai Viral Video:  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अटल सेतूवरून उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी धावत वाचवले प्राण; पाहा VIDEO

Navi Mumbai Viral Video: अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Satish Kengar

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला ही मुलुंड येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातची असल्याचं सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, अटल सेतूवर एक कार उभी असल्याचं दिसत आहे आणि या कारच्या शेजारी एक व्यक्ती उभा आहे. तर ही महिला पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. महिलेने उडी मारताच शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिला पकडलं. त्याचवेळी नवी मुंबईच्या न्हावा-शेवा वाहतूक पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले.

वाहतूक पोलीस लगेचच आपल्या गाडीतून उतरले आणि धावतं महिलेला पकडलं आणि तिचा हात धरून तिला पुलावर आणलं. यानंतर पोलिसांनी महिलेला कारमध्ये बसवलं, असं या व्हिडिओत दिसत आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी 56 वर्षीय महिला मुलुंड परिसरात राहत होती. ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील, असं महिलांचे प्राण वाचवणाऱ्या वाहतूक पोलिसांची नावे आहेत. जुलै महिन्यातही एका 38 वर्षीय अभियंत्याने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT