Wedding Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video : हळदीला पाटावर बसताना नवरी थेट खाली पडली; व्हिडिओ पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हा सर्वात मोठा आणि खास क्षण असतो. लग्नामध्ये प्रत्येक व्यक्ती सजूनधजून एन्जॉय करत असतो. अशात नवरी मुलगी नेहमीच स्पेशल दिसण्यासाठी तयार होते. लग्नामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात असे अनेक किस्से तयार होतात जे नंतर आठवून आपण खळखळून हसू लागतो.

आता देखील सोशल मीडियावर असाच एक लग्नातील गंमतीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरी मुलीची चांगलीच फजिती झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरी मुलीची हळद आहे. हळदिनिमित्त तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच विविध सुदंर अलंकार तिने परिधान केले आहेत.

नवरीला हळद लावताना पाटावर बसवले जाते. आता ही नवरी सुद्धा मंडपात येते आणि तिला पाटावर बसण्यासाठी सांगतात. ती पहिल्यांदाच पाटावर बसत असावी त्यामुळे नेमकं स्वतः चा तोल सावरून कसं बसायचं हे तिला समजत नाही. त्यामुळे नवरी पाटावर बसत असताना थेट खाली पडते. नवरी पडते तेव्हाचा तिचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

तोल गेल्याने नवरी पाटाऐवजी थेट खाली बसते. ती पडते तेव्हा तिच्या आजूबाजूला अन्य महिला बसलेल्या असतात. नवरीची फजिती पाहून सर्वजण हसू लागतात. हळदीच्या मंडपातील हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. @sk_shruti_kadla06 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओ पोस्ट करत यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मुलींना साडीमध्ये बसता येत नाही तेव्हा मुली. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्यात. काल देखील सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. ही नवरी गँगस्टर असल्याप्रमाणे एका गाण्यावर धिनताल होऊन डान्स करत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT