Viral Video  yandex
व्हायरल न्यूज

फुलांनी न्हवे तर चिप्सच्या पाकिटांनी सजवली लग्नाची कार; नेटकऱ्याना हसू अवरेना Viral Video

Viral Video: लग्नात फुलांनी सजवलेली कार आपण अनेकदा पहायला असेल. पण तुम्ही कधी चिप्सच्या पाकिटांनी सजलेली कार बघितली आहे का? असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Car Viral Video :

लग्नाला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. लग्नाच्या दिवसासाठी प्रत्येकजण नवनवीन स्वप्न रंगवतात. कोणाला डेस्टिनेशन वेडिंग करायची असते तर कोणाला पारंपारीक पद्धतीनं लग्न करायचं असतं. लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फोटोशूट देखील केला जाते. लग्नामध्ये वर वधूला त्यांच्या नातेवाईकांकडून भरपूर भेतवस्तू मिळतात. लग्नसोहळा संपल्यानंतर वधूच्या पाठवणीची वेळ येते. तिच्या आयुष्याला नवीन ओळख देणारी ती वेळ मानली जाते. तिला घेऊन जायला वरपक्षाकडून सजवलेली कार येते. त्या कारला फुलांनी आणि गुलाबांनी सजवलेलं असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये एका कारला चक्क चिप्सच्या पाकिटांनी सजवलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होणारा व्हिडिओ भारतातील एका लग्न समारंभातला आहे. ज्यामध्ये चिप्सच्या पाकिटांनी सजवलेली कार दिसत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्यापही समजलेलं नाही. हा व्हिडिओ स्तयपाल यादव यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलाय. त्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतये . व्हिडिओमध्ये एक कार येताना दिसत आहे, ज्याला विविध फ्लेवर्सच्या चिप्स पाकिटांनी सजवलेलं आहे.

त्या व्हिडिओला 'आये हम बाराती' हे लोकप्रिय गाणे जोडण्यात आले आहे. त्या कारमध्ये नवरदेवाचं आगमन होताना दिसत आहे. त्या व्हिडिओला १,७३६,९१३ लाईक्स मिळाले आहेत. या रीलवर स्विगीच्या अधिकृत अकाऊंटवरुनदेखील कमेंट करण्यात आलीय. स्विगीने कमेंटमध्ये लिहिले की, '' भाऊ आता तरी सांग नेमकं कोणत्या प्लेअवर्सचे चिप्स ती मागत होती''.

नेटकऱ्यांनी या पोस्टला भरभरुन प्रतिसाद दिलाय. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यावेळी लोकं हे रील बघून आश्चर्यचकीत झाले. सजावटीसाठी महागडी फुलं वापरण्यापेक्षा स्वस्तात मिळणारे चिप्स वापरण्यची शक्कल अनेक नेटकऱ्यांना आवडली. काही लोकांना असा देखील प्रश्न पडला की, नवदेवाचं स्व: ताचं किराणामालाचं दुकान आहे की काय? किंवा तो एखद्या किराणा स्टोअरमध्ये काम करत असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Accident : भयंकर! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, विद्यार्थिनी अन् चालकाचा मृत्यू, ८ विद्यार्थी जखमी

सायंकाळी उठला अन् घरासमोरील नाल्यात पडला; ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

Akola : शेतकर्‍याचा मोबाईल पडला विहिरीत, पठ्ठ्याने बोलावलं आपत्कालीन पथक, २२ तासांचे रेस्क्यू

PM Modi Manipur Visit : हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा

SCROLL FOR NEXT