Manasvi Choudhary
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. मकरसंक्रात हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मकर संक्रांतील घराची सजावट केली जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य आणण्यासाठी घरामध्ये सजावट करतात.
तुम्ही देखील अतिशय कमी खर्चात हटके डेकोरेशन करू शकता यासाठी आम्ही काही आयडिया तुम्हाला सांगणार आहोत.
हॉलमधील मुख्य भिंतीवर रंगीबेरंगी कागदी पतंग वेगवेगळ्या उंचीवर चिकटवा. या पतंगांना लांब दोरे लावू शकता.
दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावा यामुळे घराला सुंदर शोभा येईल.
दारासमोर पतंग किंवा सूर्याची रांगोळी काढा. तीळ- गूळ ची देखील तुम्ही रांगोळी काढू शकता.
घराच्या एका कोपऱ्यात बांबूची टोपली किंवा लाकडी पाटा ठेवा. त्यावर बाजरीची कणसे, सुगड तीळ-गूळ आणि ऊस मांडून ठेवा यामुळे खास मकरसंक्रात स्पेशल सजावट दिसेल.
खिडक्यांमध्ये किंवा बाल्कनीमध्ये लहान पिवळ्या रंगाचे फेअरी लाईट्स लावा