Massive avalanche Kedarnath Saam Tv
व्हायरल न्यूज

Massive avalanche Video: केदारनाथ मंदिराजवळील गांधी सरोवरावर हिमस्खलन, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

Bharat Jadhav

केदारनाथमधील गांधी सरोवरावर मोठं हिमस्खलन झाल्याची घटना घडली. हिमस्खलन उतारावरून खाली येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास केदारनाथ धामच्या मागे असलेल्या बर्फाळ पर्वतावर हिमस्खलन झाले. केदारनाथमधील गांधी सरोवरवरून आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिमस्खलन झाले. यात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाहीये,”, अशी माहिती रुद्रप्रयागचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) डॉ विशाखा अशोक भदाणे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

पर्वतावरून बर्फ घसरत असल्याचं दिसून आल्यानंतर केदारनाथ धाममध्ये खळबळ उडाली. बराच वेळ हिमस्खलन सुरूच होते. दरम्यान या पर्वतावर हिमस्खलन होणं सामन्य आहे. आज सकाळी गांधी सरोवरच्या वर असलेल्या टेकडीवर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनामुळे कोणतीही हानी झालेली नाहीये. या डोंगरावर वेळोवेळी असे हिमस्खलनाच्या घटना घडतात. "बर्फवृष्टी होत असताना अशा घटना घडतात, त्यामुळे कोणतेही नुकसान होत नसल्याची माहिती केदारनाथच्या सेक्टरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिली.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला केदारनाथ धाममध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ६ जूनपर्यंत ही संख्या ७ लाखांहून अधिक झाली होती. यावर्षी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री या ४ धाम यात्रा सर्किटमध्ये भाविकांच्या संख्येत वाढ झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT