Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! वर्गाच्या कोपऱ्यात बसलेला कोब्रा; सर्पमित्रांचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार व्हिडिओत कैद

School Incident Viral Video: सोशल मीडियावर सध्या ओडिशामधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका सापाशी संबंधित आहे. नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Shocking Snake Video: ओडिसामधील गजपती येथील एका प्राथमिक शाळेत एक थरकाप उडवणारी घटना घडली. वर्गात तब्बल १३ फूट लांब किंग कोब्रा शिरला,सुदैवाने हा प्रकार रात्री घडल्याने कोणतीहाही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेची माहिती शाळेतील एका व्यक्तीला कळताच त्याने सर्पमित्र आणि वनविभाग यांना पाचारणं करुन जवळपास अर्धा तास प्रयत्न करुन सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. सर्व प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एका शाळेतील आहे. व्हिडिओत पाहू शकता, एक वर्गातील खिडकी आहे ज्याच्या बाजूला असलेल्या बाकावर एक भला मोठा साप वेटोळ मारुन बसलेला आहे. काही वेळात सर्पमित्र याला पकडण्यासाठी येतात, तेव्हा साप किती भलामोठा आहे त्याचा अंदाज येतो. काही सर्पमित्रांच्या अथक पर्यत्नानंतर सापाला पकडण्यात यश मिळते.

व्हायरल होत असलेला हा प्रकार इन्स्टाग्रामवरील bbcnewsmarath या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून काही तासांपूर्वीचा असल्याचे समजत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाईक्स आणि व्ह्यूज याला मिळत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''वर्गात शिरलेला 13 फूट किंग कोब्रा बाहेर काढतानाचा थरार…''असे लिहिण्यात आलेले आहे.

घटना इतकी गंभीर आणि भयानक आहे की असंख्य अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खूप भयानक घटना आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''दिवसा असं घडलं नसतं'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''बिचारा अभ्यास करायला आला असेल'' अशा प्रकारे काहींनी मजेशीर आणि धक्कादायक(Shocking) प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT