Eco-Friendly Ganpati Saam Tv
व्हायरल न्यूज

Eco-Friendly Ganpati: गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती, शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम, वर्षाला मिळतोय २ लाखांचा नफा | VIDEO

Cow Dung Ganpati: वाशीम जिल्ह्यातील शेतकरी मनीष देशमुख यांनी शेणापासून इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्तींना बाजारात प्रचंड मागणी आहे.

Manasvi Choudhary

बाजारात इको फ्रेंडली गणपती मूर्तींना मोठी मागणी आहे. यंदा इको फ्रेंडली गणपतीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. इको फ्रेंडली गणपती मूर्ती पर्यावरणासाठी पूरक असतात. कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो . याच दरम्यान महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने अनोखा उपक्रम केला आहे. गाईच्या शेणापासून त्याने गणपतीच्या मूर्ती बनवल्या आहेत. बाजारात देखील या मूर्तींना प्रचंड मागणी आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मनीष देशमुख यांनी १,५०० हून अधिक शेणाच्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यांच्या या मूर्तींना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मनीष देशमुख यांनी सांगितले की, मागील वर्षी त्यांनी शेणाच्या मूर्ती बनवायला सुरूवात केली आहे. त्यांनी ६०० मूर्ती तयार केल्या होत्या. यामध्ये १ लाख रूपयांचा नफा झाला होता. भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांनी यावर्षी उत्पादन वाढले आणि सुमारे २ लाख रूपयांची कमाई करण्याची अपेक्षा ठेवली आहे. मात्र हा केवळ नफा नाहीतर पर्यावरणासाठी चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.

शेणापासून बनवलेल्या मूर्तीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विसर्जन. पीओपीच्या मूर्ती या पर्यावरणासाठी घातक आहेत. देशमुख यांनी बनवलेल्या मूर्तीचे खत तयार होते. पिकांसाठी देखील याचा वापर होतो. गणपती बाप्पा आपल्याला निसर्गाचे रक्षण आणि संगोपन करायला शिकवतात हेच उदाहरण समोर ठेवून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.

हा उपक्रम अनेकांच्या उपजिविकेचे साधन देखील बनला आहे. यावर्षी त्यांनी १० बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला. ज्यांनी ही कला शिकली आणि उत्पादनात हातभार लावला. यावरून प्रेरणा घेत देशमुख यांनी अगरबत्ती आणि शेणापासून बनवलेल्या इतर उत्पादनांवर प्रयोग करण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: घरबसल्या पूर्ण होतील शासकीय कामे, व्हाट्सअ‍ॅपवर मिळतील कागदपत्रे

Ratnagiri Crime : वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्रस्त मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव; रक्ताच्या थारोळ्यात आईला पाहून आत्महत्येचा प्रयत्न

Sambhajinagar: आधी पेट्रोल ओतलं नंतर पेटवून दिलं, माथेफिरूचा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलं

Gold Silver Price : गणेश चतुर्थीआधी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका, सोनेचांदीचा भाव लाखाच्या पार

SCROLL FOR NEXT