Ganpati Fugdi Dance: 'बस फुगडी, पाय लंगडी'; ७५ वर्षीय आजींची रंगली जुगलबंदी VIDEO

Ganpati Fugdi Dance Video: कोकणात गणेशोत्सवात फुगडीला विशेष महत्त्व आहे. ७५ वर्षांच्या आजींचा बसफुगडी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Ganpati Fugdi Dance
Ganpati Fugdi DanceSaam Tv
Published On

कोकण आणि गणपती हे समीकरण फार पूर्वीपासून आहे. कोकणात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असतो. घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होते आणि भजन, किर्तन, फुगडी, पारंपारिक नृत्य सादर केले जातात. गणेशोत्सवात महिला खास पारंपारिक कार्यक्रमासह फुगडी खेळतात. अनेक महिला या गौरी, गणपतीसमोर पारंपारिक गाणी म्हणत नृत्य सादर करतात. यामध्ये कोकणात वयोवृद्ध महिलांचा हात कोणी धरू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच वृद्ध आजींचा बसफुगडी खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Ganpati Fugdi Dance
Viral Video: रिलचा आगाऊपणा नडला, प्रसिद्ध यूट्यूबर पाण्यात वाहून गेला अन्... ; काळजाचा थरारक उडणारा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजी या पारंपारिक नृत्य सादर करत आहे. या दोघींनी बसफुगडीचा आनंद लुटला आहे. एवढच नाहीतर या दोघींमध्ये फुगडी खेळण्याची जुगलबंदी लागली आहे. अत्यंत उत्साहीने त्या फुगड्या खेळताना दिसत आहे. या दोघींच्या वयाचा विचार केला असता या ७० च्यावर असतील. मात्र याही वयातील यांच्या उत्साहाला तोड नाही. नऊवारीत आजींनी फुगडी खेळण्याचा ठेका धरला आहे.

कोकणातील आजींचा फुगडी खेळतानाचा व्हिडीओ @maza_gaav_lahulase या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये,कोकणातील पारंपारिक बस फुगडी वयाची ७५ री पार… पण उत्साह तरुणींनाही लाजवेल. आमच्या निरामामी आणि बायआत्या यांची जुगलबंदी सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे. आजींच्या फुगडी खेळणाच्या व्हिडीओ लाखो लाईक्स आले आहेत. अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Ganpati Fugdi Dance
Viral Video: ‘अगं कमला उठ पाय धू...’ शिक्षिकेची भन्नाट ट्रिक, मुलांना तोंडपाठ झाले महाराष्ट्राचे ३६ जिल्हे, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com