Wardha News fight between two groups of transgender in Hinganghat Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी कुटलं; लोक बघत राहिले

Tritiyapanthi Viral Video: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जुन्या श्रीराम वार्डात शनिवारी हा प्रकार घडला. दरम्यान, हाणामारीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Satish Daud

चेतन व्यास, साम टीव्ही

Hinganghat Tritiyapanthi Viral Video

कार्यक्षेत्र सोडून पैसे जमा केल्याच्या रागातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील तृतीयपंथीयांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जुन्या श्रीराम वार्डात शनिवारी हा प्रकार घडला. दरम्यान, हाणामारीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Latest Marathi News)

भर रस्त्यात झालेला सुरू असलेला हा राडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रकरण पोलिसांपर्यंत (Police) पोहचताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत 149 कलमअंतर्गत नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाटमध्ये (Wardha News) तृतीपंथीनी पैसे गोळा करण्याकरिता आपआपले कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. अशातच शुक्रवारी तृतीयपंथीयांचा एका गटाने आपले कार्यक्षेत्र सोडत हिंगणघाट शहरात येत पैसे गोळा केले.

शनिवारी ही बाब दुसऱ्या गटाच्या लक्षात आली. त्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने ऑटोने हिंगणघाट गाठत पैसे गोळा करणाऱ्या गटाला मारहाण केली. तृतीपंथीचे दोन गट आपसात भिडत असल्याच पाहताच नागरिकांनीही चांगलीच गर्दी केली होती.

काहींनी या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) आपल्या मोबाइल कॅमेरात कैद केला. तृतीयपंथीचे दोन गट आपसात राडा करत असल्याचे कळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही गटातील सदस्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेत समज देत सीआरपीसीच्या कलम 149 अन्वये नोटीस देत समज दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT