Boyfriend girlfriend leave request SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Post: गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवायचा होता, बॉयफ्रेंडने सुट्टी मागितली; बॉसचा एकाच वाक्यात चक्रावणारा रिप्लाय

Boyfriend girlfriend leave request: ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी बॉसकडे सुट्टीची मागणी केली. ही मागणी ऐकून बॉसने दिलेले उत्तर सर्वांना गोंधळात टाकणारे ठरले.

Surabhi Jayashree Jagdish

ऑफिसमधून सुट्टी पाहिजे असेल तर आपल्याला बॉसला विविध कारणं द्यावी लागतात. कधी तब्येत बरी नाही, कधी घरी इमरजेंसी आहे अशी कारणं देऊन सुट्टी मागावी लागते. तर काही लोकं अगदी खोटं बोलूनही सुट्टी मागतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, गर्लफ्रेंडला भेटायला जायचंय म्हणून कोणी सुट्टी मागितली. आता तुम्हाला हे वाचून नक्कीच हसू येईल. मात्र अशी घटना खरंच घडलीये.

सध्या काळानुसार लोकं एकमेकांच्या समस्या समजू लागलेत. नुकतंच प्रोफेशनल नेटवर्किंग लिंक्डइनवर एका मॅनेजरने पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ऑफिसच्या सुट्ट्यांबाबत लोकांचा दृष्टीकोन बदलत असल्याचं समोर आलं आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. ज्यामध्ये अनेकांनी त्यांचं मतही दिलं. या पोस्टमध्ये एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला होता. यामध्ये ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पर्सनल कारण सांगत १६ डिसेंबर रोजी सुट्टी मागितली होती.

मेलमध्ये काय लिहिलं होतं?

या इमेलमध्ये लिहिण्यात आलं होतं की, त्याची गर्लफ्रेंड 17 डिसेंबरला तिच्या घरी म्हणजे उत्तराखंडला जाणार आहे. ती जानेवारीपूर्वी पुन्हा येणार नाही, असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत तिला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टीची रिक्वेस्ट करण्यात आली होती.

मॅनेजरने त्याच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?

याचा स्क्रिनशॉट शेअर करताना मॅनेजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मला हा मेसेज माझ्या इनबॉक्समध्ये आला. जर ही गोष्ट १० वर्षांपूर्वीची असती तर सकाळी बरोबर ९.१५ वाजता मला सिक लीवचा मेसेज आला असता. आता कर्मचारी स्वतः खरं-खरं कारण सांगून सुट्टी मागतात. आता काळ बदललाय आणि खरं सांगायचं तर हे मला खूप आवडलंय. प्रेमापुढे कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे सु्ट्टीला मंजूरी.

मॅनेजरने ही पोस्ट करून जाहीर केलं आहे की, पर्सनल गोष्टींसाठी लोकं विविध-पद्धतीचे बहाणे तयार करायचे. यावेळी त्या मॅनेजरने जुन्या काळात ऑफिसचं वातावरण कसं असायचं आणि लोकं पर्सनल गोष्टी शेअर करत नव्हते असं म्हटलंय. तर आता ऑफिसमधील विचार आणि व्यवहार या दोघांमध्ये बदल पाहायला मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

Maharashtra Nagar Palika Election Result Live : अकलूज नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे २२ उमेदवार विजयी

Daily Wear Silver Jewellery: ऑफिस किंवा कॉलेज वेअरसाठी ट्राय करा 'या' ट्रेंडी यूनिक सिल्व्हर ज्वेलरी

Nagaradhyaksha Winners List : तुमचा नगराध्यक्ष कोण? २८८ विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Dhule : धुळ्यातील शिंदखेडामध्ये भाजपला मोठा धक्का! अजित पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी

SCROLL FOR NEXT