Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया; चिमुकल्याचं गाणं ऐकून तुमचेही डोळे पानावतील

Visru nako e aai bapala song video: गाण्यात चिमुकल्याने गायलेल्या ओळी काळजाला स्पर्श करणाऱ्या आहेत. चिमुकल्याचा हा व्हिडिओ फार जुना आहे. मात्र आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ नव्याने व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Small Boy Viral Video:

सोशल मीडिया हे एक असं मध्यम आहे जिथे सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यात कधी दुःख, तर कधी आनंद अश्रू तसेच कधी हास्यास्पद आणि काळजात धडकी भरवणारे देखील व्हिडीओ असतात. आई आणि बाबा हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठे आधार स्थंभ असतात. आई वडिलांना दुखावलेली व्यक्ती आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही असं म्हणतात. अशात एका चिमुकल्याचं आई बाबांवर गायलेलं एक गाणं व्हायरल झालं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला विसरू नको रे आई बापाला हे गाणं गात आहे. या गाण्यात त्याने गायलेल्या ओळी काळजाला स्पर्श करणाऱ्या आहेत. चिमुकल्याचा हा व्हिडिओ फार जुना आहे. मात्र आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ नव्याने व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या चिमुकल्याचा व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा आहे. @mohan sangewar नावाच्या या यूट्यब चॅनलवर हा व्हिडिओ सर्वात आधी पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर 11 वर्षांनी याच मुलाने पुन्हा एका समारंभात आपल्या आवाजाने आणि गाण्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. आता देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अनेक मुलं लग्न संसार किंवा नोकरीच्या शोधत घरापासून दूर जातात. मात्र आपला मुलगा किंवा आपली मुलगी आपल्या म्हातारपणाची काठी बनून पुन्हा आपल्याकडे परतेल या आशेने आई वडील त्यांची वाट पाहत असतात. मात्र अनेक मुलं प्रगतीच्या मार्गावर असताना आपल्या आई वडिलांना विसरून जातात. त्या आई वडिलांना होणारं दुःख फार मोठं असतं.

संस्कृती आणि कला गुणांनी समृध्द असलेल्या आपल्या महाराष्ट्रात आजवर अनेक वृद्धाआश्रम उभी राहिली आहेत. आई वडील प्रगतीत अडथळा निर्माण करत आहेत. आमचं त्यांच्याशी पटत नाही, अशी काही कारणे सांगून अनेक जण आपल्या माता पित्याला आश्रमात ठेवतात. असं वागणाऱ्या सर्वच तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारं हे गाणं आता पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT