Trending Viral Video: लग्न म्हटलं की प्रत्येकाला काहीतरी खास, हटके आणि लक्षवेधी क्षण अनुभवायची आणि दाखवायची इच्छा कायमच असते. मग अगदी नवरदेव आणि नवरीपासून ते वऱ्हाड्यांपर्यंत प्रत्येक जण त्या दिवशीचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी काही ना काही विशेष करत असतो. सध्या अशाच एका मराठमोळ्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाने नवरीला भर वऱ्हाडात उचलून भन्नाट डान्स केल्याचे दृश्य पाहायला मिळते.
या व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये नवरदेवाचा जोश आणि ऊर्जा इतकी अफाट आहे की, पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू येते. लग्नमंडपात संगीताच्या तालावर नाचताना नवरदेव अचानक नवरीला उचलतो आणि दोघं एकत्र डान्स करतात. हा सीन इतका सुंदर आणि उत्साही आहे की तो पाहून कोणाचाही मूड फ्रेश होईल. या क्षणात नवरीही पूर्णपणे सहभागी झाल्याचे दिसत आहे आणि ती देखील आनंदात नाचताना दिसते
या अप्रतिम डान्स(Dance) परफॉर्मन्समुळे वऱ्हाडी अक्षरशः थक्क झाले. पारंपरिक पद्धतीने चाललेल्या लग्नात असा उत्साही आणि रोमँटिक डान्स पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे भाव उमटले. कधी नवऱ्याच्या स्टाईलवर टाळ्यांचा कडकडाट झाला, तर कधी नवरीच्या साथीत वन्समोरची मागणी करण्यात आली.
हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच काही तासांतच हजारो लोकांनी पाहिला. अनेकांनी कमेंटमध्ये नवरदेवाच्या आत्मविश्वासाचे आणि जोशाचे कौतुक केलं. काहींनी तर लिहिलं की,"अशा नवऱ्याची स्वप्नातही कल्पना नव्हती", तर काहींनी म्हटलं, "हे तर बॉलीवूडच्या सिनेमालाही मागे टाकेल''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.