सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असतात. मोठ्यातल्या मोठ्या शहरापासून ते जगाच्या कानोकापऱ्यातील परिसरातील गोष्टी पाहायला मिळतात. या व्हायरल होत असलेल्या आपल्याला अनेक जुगाड करणारे व्यक्ती पाहायला मिळतात.हे व्हिडिओ पाहून आपल्यापैंकी अनेकजण विचारात पडतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय,जो पाहून तुम्हाला हसण आवरणार नाही.
लोकल ट्रेन असो वा एक्सप्रेस असो. दर दिवशी यामध्ये आपल्याला प्रवाशांची असंख्य अशी गर्दी पाहायला मिळते. अनेकांना या गर्दीमुळे बसण्यासाठी जागा मिळत नाही. अनेकदा आपण लोकल ट्रेनमध्ये किंवा मेट्रोमध्ये जागेसाठी वादविवाद शिवाय हाणामारी होते. याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका पठ्ठ्याने जागा न मिळाल्याने जो काही जुगाड(Jugad) केला आहे, तो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लोकल ट्रेनमधील(Local Train) दिसत आहे. या लोकलमध्ये मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.यात गर्दीत तुम्ही नीट पाहिले तर दिसेल एक व्यक्ती चक्क ट्रेनवरील असलेल्या हॅंडलवर दोन वेगवेगळ्या चादरी बांधलेल्या आहेत आणि या चादरवर तो व्यक्ती बसलेला आहे. जो ही त्या व्यक्तीला पाहतो आहे तो खदखदून हासत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''rahulmehto2525'' या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ३ हजारांच्या घरात व्हिडिओला (Video)लाइक्स मिळाले आहेत तर असंख्य व्हयूज व्हिडिओला येत आहेत.
प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली मेट्रो (Metro_)किंवा मुंबई लोकलमधील नसून चक्क बिहार रेल्वेमधील असल्याचे समजते. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजरने प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यातील पहिला यूजरने लिहिले आहे की,' हा तर बिहारचा स्पायडरमॅन बनला आहे''.तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'हा तर मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसत आहे'',अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओला पाहून मिळत आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.