Viral Video  x
व्हायरल न्यूज

महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

Mumbai Local Train Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला समोरून येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने दगड फिरकावत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ मुंबईतला असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • सोशल मीडियावर थरारक व्हिडीओ व्हायरल

  • महिला ट्रेन चालकाच्या दिशेने दगड फेकते

  • व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Viral : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला चालत्या लोकल ट्रेनच्या दाराशी उभी राहून शेजारच्या ट्रॅकवर येणाऱ्या ट्रेनवर मोठा दगड फेकताना दिसते. ही घटना मुंबईत घडल्याचा अनेकांनी दावा केला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांनी या व्हिडीओच्या खाली कमेंट करत त्यामागील सत्य समोर आणले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये वृद्ध महिला एक मोठा दगड हातात घेत समोरून येणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनवर मारत असल्याचे पाहायला मिळते. दगड फेकल्यानंतर ती ट्रेनवर ओरडताना दिसते. ती नक्की काय बोलते हे समजत नसले तरी तिच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.

व्हायरल पोस्टमुळे सुरुवातीला दिशाभूल झालेल्या मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स अकाउंटने व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये मुंबई गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला चौकशीसाठी टॅग केले. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ पूर्व रेल्वे नेटवर्क अंतर्गत येणाऱ्या एखाद्या प्रदेशातून आला असल्याचे दिसते. हा व्हिडीओ मुंबईमधील नाहीये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय ट्रेनची रचना मुंबईतील लोकल ट्रेनसारखी नसल्याचे काही यूजर्सनी म्हटले आहे. ट्रेनवर ER असे लिहिलेले दिसते. मुंबई आणि आसपासच्या परिसरात ER विभागांतर्गत लोकल ट्रेन धावत नाहीत.

अधिकाऱ्यांनी घटनेचे ठिकाण कुठले आहे हे सांगितले नसले, तरीही व्हायरल व्हिडीओला प्रतिसाद देताना, ही बाब संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी @ErRpf" @ErRpf ने त्यानंतर हावडा आणि सियालदाह स्थानकांच्या आरपीएफला थ्रेडमध्ये टॅग केले. महिलेवर कारवाई होईल असे आश्वासनही देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT