Train Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची सध्या चर्चा हो आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी ट्रेनच्या दारापाशी रील शूट करत असल्याचे दिसते. पुढे व्हिडीओमध्ये या मुलीची आई तिला जोरदार चोप दिला. ओरडा पडल्यावर ही तरुणी तिच्या आईची विनवणी करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
आजकाल सोशल माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काहीजण स्टंटबाजी करुन रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचे प्रयत्न करतात. इंटरनेटवर तरुणाईचे स्टंटबाजी करतानाचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळत असतात. अशाच एका व्हिडीओची सध्या तुफान चर्चा होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या दारावर उभी राहून रील बनवताना दिसते. रील बनवण्याच्या नादात ती धावत्या ट्रेनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. ती एका तरुणाचा हात धरुन ट्रेनच्या बाहेर देखील लटकते. त्यानंतर या गोष्टीवरुन तरुणीच्या आईने तिचा चांगलाच समाचार घेतल्याचेही पाहायला मिळते.
ट्रेनच्या बाहेर लटकून स्टंटबाजी केल्यानंतर ही तरुणी जेव्हा कोचमध्ये परतते. तेव्हा या तरुणीची आई तिला चोप देते. कोचमध्ये बसलेले लोक त्या तरुणीला मार पडू नये म्हणून मध्यस्थी करतात. त्यानंतरही तरुणीला थोडा मार बसतो. पुढे ती आईची माफी मागत यापुढे असं करणार नाही असं म्हणते. आई-मुलीचा ट्रेनमधला ड्रामा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.