Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! धावत्या ट्रेनसोबत सेल्फी घेणं तरुणीच्या अंगलट; VIDEO पाहून उडेल थरकाप

Shocking Viral Video: रील आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्याचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले आपण पाहिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया अगदी कमी वेळात प्रसिद्धसाठी असलेले एक माध्यम आहे. सोशल मीडियावर अनेकांचे लाईक्स ,कमेंट्स आणि स्वता:चे कौतुक व्हावे त्यासाठी प्रत्येकजण अनोखी पोस्ट टाकत असतो.मात्र या पोस्टसाठी कधी धोकादायक ठिकाणी स्टंट करणं तसेच अनोख्या पोजमध्ये फोटो काढणं, असे अनेक प्रयोग तरुणाईपासून अनेकजण करत असतात. मात्र बु्द्धीचा योग्य न वापर करता अनेकांना स्वता:चा जीव गमवावा लागतो या पोस्ट आणि व्हिडिओ करण्याच्या नादात.या सर्व घटना आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ पाहून समजतात. सध्या असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अपघांताच्या घटनेत सातत्याने वाढत होताना दिसून येत आहे. कुठे व्यक्तीचा स्वता:चा निष्काळजीपणा मृत्यूस आमंत्रण देतो.तर कुठे सोशल मीडियाचा प्रचंड वापर.या कारणासंबंधित असणारे अपघातांचे प्रसंग गेल्या काही महिन्यापूर्वी घडलेले आहे आणि त्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या एका महिलेचा आहे. ज्यात तिला रील्स काढण्याच्या नादात स्वता:चा जीव गमवावा लागला आहे. सध्या सोशल मीडियाच्या प्रत्येक मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ (Video)व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्हाला एका रेल्वे ट्रॅकच्या जवळचा परिसर दिसून येत आहे. या रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे. या गर्दीमध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्ती तसेच महिला आणि लहान मुलं दिसून येत आहेत. मात्र काही वेळात रेल्वे ट्रॅकवरुन एक रेल्वे येणार असते.

त्यासाठी प्रत्येकजण आपले मोबाईल हातात धरुन येणाऱ्या रेल्वेचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त दिसत आहेत. मात्र याच मधील एक महिला अगदी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मोबाईल धरुन उभी आहे. मात्र ही महिला अति उत्साहाच्या नादात सर्व प्रसंग मोबाईलमध्ये कैद करायला जाते. मात्र महिलेच्या निष्काळजीपणामुळे महिलेला जोरात येणाऱ्या रेल्वेचा धक्का लागतो आणि ती जागच्या जागी जोरदार आपटली जाते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''एक्सवरील @SecB4_Blunder'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज शिवाय अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मात्र जगभरात निष्काळजीपणामुळे (Carelessness)व्यक्तींना जीव गमवावे लागत आहेत. तरी व्यक्ती सावधगिरीने वागताना दिसून येत नाहीत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT