Traffic rule violation by police SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video : पुण्यात पोलिसांनीच कायदा मोडला, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरतानाचा कॅमेऱ्यात कैद

Traffic rule violation by police: पुणे पोलीस दलातील तीन महिला कर्मचारी एका दुचाकीवरून प्रवास करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण या म्हणीची प्रचिती पुण्यातून समोर आली आहे. सामान्य पुणेकरांना अनेक वेळा वाहतुकीचे नियमांचे धडे गिरवणाऱ्या किंवा वेळोवेळी नागरिकांना उपदेश करणाऱ्या पुणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामुळे पोलिसांनी स्वतः वाहतुकीचे नियम तोडल्याचं दिसतंय.

पुण्यात वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणाऱ्या पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये पोलीस दलातील तीन महिला कर्मचारी एका बाईकवर ट्रिपल सीट प्रवास करताना दिसतायत. या घटनेमुळे नियमांचं पालन आणि जबाबदारीच्या मुद्द्यावरून चर्चांना उधाण आलंय.

काय दिसतंय व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये एका रस्त्यावरून जात असलेल्या स्कुटीरून तीन महिला पोलीस कर्मचारी बसलेल्या दिसतात. स्कुटी चालवताना ट्रिपल सीटने केलेला प्रवास हा वाहतूकीच्या नियमांचा भंग मानला जातो. विशेष म्हणजे, अलीकडेच शहरात ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून मोहीम राबवण्यात आली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात दंड वसूल झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या व्हिडीओने आता सामान्य नागरिकांचं अधिकच लक्ष वेधलंय.

हा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याकडे 'नियम सर्वांसाठी समान असावेत' असं म्हटलंय. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, 'जनतेला नियम सांगणाऱ्यांनीही त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. कदाचित तातडीची ड्युटी किंवा विशेष गंभीर परिस्थिती असू शकते, असं मतही काहींनी मांडलंय.

या व्हिडीओबाबत पुणे पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. संबंधित महिला कर्मचारी कोणत्या विभागातील आहेत किंवा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT