Kalyan railway station fight saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: झिंज्या ओढल्या, लोकलमधून खाली खेचलं आणि...! कल्याण रेल्वे स्टेशनवर महिलांच्या डब्यात राडा

Kalyan railway station fight: कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांच्या डब्यात तरुणीला मारहाण करून जबरदस्तीने लोकलमधून उतरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर प्रवाशांनी संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रेल्वे स्टेशन आणि ट्रेनच्या डब्यातील महिलांचे वाद काही नवीन गोष्ट नाही. असाच एक वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांच्या डब्यात एका तरुणीला मारहाण करून तिचे केस ओढत जबरदस्तीने लोकलमधून खाली उतरवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हा प्रकार कल्याणहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानकावरून लोकल सुटत असताना ही तरुणी गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी गर्दीमुळे तोल जाऊन ती पडली. त्यानंतर डब्यातील काही महिला प्रवाशांनी तिच्यावर संताप व्यक्त करत मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. इतकेच नव्हे तर तिचे केस ओढत तिला जबरदस्तीने खाली उतरवण्यात आल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय.

या घटनेमुळे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय. महिलांच्या डब्यातच अशी मारहाण झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचा निषेध केला. 'गर्दी असली तरी मारहाण योग्य नाही', अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिलीये. तर काहींनी रेल्वे प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली.

घटनेबाबत रेल्वे पोलीस यांच्याकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओच्या आधारे संबंधित महिलांची ओळख पटवून कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.

दरम्यान, मुंबई उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणारे वाद याबाबत प्रवासी संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, गर्दीच्या वेळेत प्रवाशांमध्ये धक्काबुक्की आणि वादाच्या घटना वाढत असून त्यासाठी अधिक सुरक्षा कर्मचारी आणि जनजागृतीची गरज आहे.

वाढत्या गर्दीमुळे लोकलमध्ये प्रवाशांमध्ये वादाच्या घटना वाढत असल्याचंही चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने महिलांच्या डब्यात सुरक्षा वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्याचं दुर्दैव आहे, शासन व प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही - यशोमती ठाकूर

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT