Viral phone blast video SAAM TV
व्हायरल न्यूज

Mobile phone explosion: गेम खेळताना हातात मोबाइलचा स्फोट, चिमुकलीला गंभीर दुखापत; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Viral phone blast video: मोबाइलवर गेम खेळत असताना एका मुलीच्या हातातील फोन अचानक फुटल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मुलांच्या मोबाइल वापराबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल लहान मुलांच्या हातात मोबाइल फोन दिसणं ही सामान्य गोष्ट झालीये. गेम खेळणं, व्हिडिओ पाहणं किंवा सोशल मीडियावर वेळ घालवणं हे लहान मुलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलंय. मात्र मोबाइलचा वापर नेहमीच सुरक्षित असतो असं नाही. याच संदर्भात सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओने पालकांचं लक्ष मात्र वेधून घेतलं आहे.

काय घडलंय व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सोफ्यावर आरामात बसलेली दिसतेय. ती बसून मोबाइलवर गेम खेळतेय. यावेळी ती पूर्णपणे गेममध्ये गुंतलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर खेळाचा आनंद आहे. सुरुवातीला सगळे काही अगदी सामान्य सुरु असताना मात्र काही सेकंदांतच अचानक अशी घटना घडते की व्हिडीओ पाहणाराही दचकतो.

काही क्षणांतच मुलीच्या हातातील मोबाइल फोनचा मोठा आवाज होतो आणि तो फुटतो. या स्फोटानंतर मोबाईलला आगही लागतो. हा स्फोट इतका अचानक होतो की मुलगी घाबरून जोरात किंचाळते. ती लगेच मोबाइल हातातून फेकून देते आणि तिथून दूर पळून जाते. सुदैवाने या घटनेत मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचं दिसत नाही. तरीही हा प्रसंग पाहून सोशल मीडियावर अनेकजणांना हादरा बसला आहे.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स @55MTQ_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडिओसोबत 'जर तुमची मुलंही मोबाइल वापरत असतील तर सावध राहा,' असं कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केला असावा असा संशय व्यक्त केलाय. तर काहींनी तो खरा असू शकतो असंही म्हटलंय.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शुल्लक कारणातून शेजाऱ्याला रॉडने मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Gudi Padwa 2026: घरात गुढी कोणत्या दिशेला उभी करायची?

Geeta Basra: क्रिकेटरच्या प्रेमासाठी सोडलं करियर; आता लग्नाच्या १० वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये करणार मोठा कमबॅक

Summer Beaches Tourism: मुलांसोबत मार्चमध्ये फिरायला जायचा प्लान करताय? मग मुंबईजवळचे हे स्वच्छ समुद्र किनारे नक्की पाहा

Mango Yogurt : घरी बनवा टेस्टी मँगो योगर्ट, उन्हाळ्यासाठी हेल्दी डेजर्ट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT