kids copying dangerous content from instagram reels saam tv
व्हायरल न्यूज

Viral video: धक्कादायक! रील्स बघून मुलांनी बनवली जीवघेणी वस्तू; व्हिडिओ पाहून पालकही झाले हैराण

kids copying dangerous content from instagram reels: सोशल मीडियावरील रील्सचा मुलांवर होणारा प्रभाव समोर आणणारा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पालकांनी मुलांच्या ऑनलाइन सवयींकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं समोर येतं.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. मुलं आणि तरुणांमध्ये इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरील रील्सचा मोठा प्रभाव दिसून येतो. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने हे सोशल मीडिया किती धोकादायक ठरू शकतं हे समोर आलं आहे. बाजू समोर आणली असून मुलं रील्स पाहून धोकादायक वस्तू तयार करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतोय. त्यामध्ये काही लहान मुलं रील्समधून प्रेरणा घेऊन एका धोकादायक वस्तूची निर्मिती करताना दिसतात. व्हिडिओमध्ये एक महिला ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसते. ती मुलांनी तयार केलेल्या वस्तूचं शूटींग करते. यावेळी ती सांगते की, ही कोणतीही साधी खेळणी नसून ती इतरांना इजा पोहोचवू शकणारी आहे.

यानंतर व्हिडिओमध्ये मुलांचे वडील संतापलेले दिसतात. ते मुलांना कठोर शब्दात समज देताना आणि मारताना दिसतात. 'पुन्हा अशी चूक करू नका,' असे ते वारंवार सांगताना ऐकू येतंय. या घटनेमुळे सोशल मीडियावर पालकांच्या भूमिकेबाबत आणि मुलांच्या वागणूकीवरून एकच चर्चा रंगलीये.

या व्हिडिओवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी मुलांना सोशल मीडिया वापरू देणं धोकादायक असल्याचं म्हटलंय. तर काहींनी 'लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे,” असं म्हटलंय. तर काहींनी वडिलांवर टीका करत, “मारहाण हा योग्य उपाय नाही,” असं मत व्यक्त केलंय.

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या कंटेंटमुळे मुलं सहज त्याचं अनुकरण करू पाहतात. ज्यामुळे अशा घटना घडू शकतात. अशावेळी पालकांनी मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणं आणि त्यांना चूक-बरोबर यातील फरक समजावून सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कॉलेजच्या वस्तीगृहातच घेतला गळफास

'झिम्मा' चा खेळ पुन्हा रंगणार; सिद्धार्थ चांदेकर नव्या ट्रिपसाठी तयार, Jhimma 3 ची 'या' तारखेला होणार थिएटरमध्ये एन्ट्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी शेवटचे १० दिवस, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

Maharashtra Live News Update : दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी करा- विनायक राऊत

Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

SCROLL FOR NEXT