Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं! क्षुल्लक कारणांवरुन महिला डब्ब्यात घडलं भयंकर;VIDEO पाहतच राहाल

Mumbai Local Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलांच्या डब्ब्यातील तुफान हाणामारी पाहण्यासाठी तुम्हाला मिळत आहे.

Tanvi Pol

Women Fight In local Train: मुंबई लोकल ट्रेनला मुंबई शहराचे हृदय म्हणतात.काही कारणांमुळे लोकल बंद झआली तर संपूर्ण मुंबई थांबली जाते.मात्र गेल्या काही वर्षापासून हीच मुंबई लोकल त्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जगभरात चर्चेत येत आहे.त्यातच सध्या मुंबई लोकल ट्रेनची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा होत आहे,मात्र कारण लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या महिलांच्या जोरदार राड्याचे आहे.

महिलांचा जोरदार राडा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मुंबई लोकल (Mumbai Local)ट्रेनमधील महिलांचा डब्बा दिसत आहे.या डब्ब्यात महिला प्रवाशांचा मोठी गर्दी दिसत आहे.प्रवाशांना शांत दिसणाऱ्या या डब्ब्यात एक महिला आणि तरुणींमध्ये जोरदार वाद सुरु होतात,त्यानंतर त्याच दोंघीमध्ये हाणामारीही होते.तुफान भांडणाचा प्रकार ट्रेनमधील एका महिलेने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सध्या महिलांच्या राड्याचा व्हिडिओ chalo.virar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल होत आहे.हाणामारीचा हा व्हिडिओ विरार या ट्रेन मार्गातील असल्याचे समजत आहे.ऐवढेच नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेला आहे.

महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे,''लाडक्या बहिणी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पुरुषांच्या डब्ब्यात असे कधीच होत नाही'' तर तिसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''तिसरे महायुद्ध''अशा मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT