हिवाळा म्हटलं की आठवते ती हुडहुडी भरवणारी थंडी. मिडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक प्रसंगातील व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सोशल मीडियावर कायमच पावसाळ्यातील व्हिडिओ असतील तसेच उन्हाळ्याच्या दिवसातील अनेक भयानक घटना दाखवणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात महिलेचे केस थंडीने अगदी बर्फासारखे जाम झालेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,एल्वीराच्या आजूबाजूला बर्फ आहेत तसेच एवढ्या थंडीतही तिने टोपी घातली नाही.स्वीडन येथे पडलेल्या थंडीत चक्क तिचे केस बर्फासारखे जमले आहेत. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'तापमान -30 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे'.
व्हायरल होत असलेली एलविरा नावाची ही महिला स्वीडन येथील सोशल मीडिया इंफ्लूएंसर आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे तो पाहून प्रत्येतजण आश्चर्यचकीत झाला आहे. सध्या जगभर असे अनेक देश आहेत जिथे थंडीचे प्रमाण प्रचंड असते.यात या व्हिडिओने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे.
व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय. एका यूजरने लिहिलंय की,'आश्चर्यकारक व्हिडिओ' अशाच प्रकारे व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करीत आहे. महिलेच्या व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.