Israel-Hamas War : इस्राइलच्या २५ वर्षीय तरुणीची जगभर चर्चा; प्रसंगावधानामुळे मोठा नरसंहार टळला, त्या ४ तासात काय घडलं?

Israel-Palestine War :इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे ३००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas War Saam TV
Published On

Israel-Hamas War Update :

इस्राइल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 3000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्राइलने आक्रमक पवित्रा घेत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा स्पष्ट केलं आहे. तसेच आयुष्यभर लक्षात राहिल, असं प्रत्युत्तर हमासला दिलं जाईल, असा इशारा इस्राइलने दिला आहे.

या युद्धादरम्यान एक महिला सैनिक चर्चेत आहे. इस्राइलच्या 25 वर्षीय इनबार लिबरमनने हमासच्या दहशतवाद्यांना सळो की पळो केलं. इनबार लिबरमन हिने काही साथीदारांसोबत मिळून हमासच्या हल्ल्यापासून नागरिकांचा जीव वाचवला.

एवढंच नाहीतर या सर्वांनी मिळून हमासच्या दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा देखील केला. एकट्या लिबरमनने पाच दहशतवाद्यांना ठार केले. लीबरमनची तिच्या या शौर्यासाठी जगभरात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Israel-Hamas War
Israel-Hamas War:इस्राइल-हमासच्या युद्धादरम्यान का होते अटल बिहारी वाजपेयींची चर्चा? काय आहे कारण?

इनबार लिबरमन ही गाझा पट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नीर अॅम या किबुट्झची सिक्युरिटी कोऑर्डिनेटर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताच लीबरमन यांना स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटांचा आवाज ऐकताच लीबरमन सावध झाली आणि तिने ताबडतोब 12 लोकांच्या सुरक्षा पथकासह मोर्चा सांभाळला.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्रायलकडून तिसऱ्यांदा एअर स्ट्राईक, हमासची 2200 ठिकाणं उद्ध्वस्त; 3000 लोकांचा मृत्यू

लीबरमनने टीमसोबत मोठं शौर्य दाखवत 4 तास दहशतवाद्यांशी धैर्याने मुकाबला केला आणि दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांनी निर अॅमच्या आजूबाजूच्या परिसरात नरसंहार केला. पण त्यांना निर अॅममध्ये कोणतेही नुकसान करता आले नाही. इनबार लिबरमनच्या शौर्याची इस्त्रायली सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com