Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Nahur Viral Video: पुन्हा एकदा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा सर्रास अपमान करण्यात आलाय. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
viral video
viral videotwitter
Published On

बातमी मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाणारी... आज पुन्हा एकदा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा सर्रास अपमान करण्यात आलाय. मुंबईतल्या नाहूर मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनं नेमकं काय केलं पाहूया. या रिपोर्टमध्ये....

ऐकलंत.. ही मुजोरी आहे मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याची... मला मराठीत बोलता येत नाही असं हा रेल्वेचा मुजोर कर्मचारी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कुत्सितपणे हसून सांगतोय. नाहूरमध्ये मराठी तिकीट मागणाऱ्याला या कर्मचाऱ्यानं हिंदीत बोलण्याचा आग्रह करत तिकीट देण्यास नकार दिला असा हा आरोप या प्रवाशांनं केलाय.

viral video
Viral Video: खरा मुंबईकर! वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी काढला हटके मार्ग; VIDEO होतोय तूफान व्हायरल

रेल्वे कर्मचाऱ्यांनी मराठीचा अपमान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही अगदीच 20 दिवसांपुर्वी रेल्वेत मराठी नही चलेगा म्हणत नालासोपाऱ्यात एका टिसीनं एका मराठी दांपत्याला डांबून ठेवलं होतं. आणि त्यानंतर नाहूरमध्ये तिकीट देणाऱ्या या कर्मचाऱ्याचा हा मस्तवालपणा समोर आल्यानं समस्त मराठी जनतेनं संताप व्यक्त केलाय.

viral video
Viral Video: खतरनाक! भररस्त्यात तरुणांचा बेफाम डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले राडा केला रावं

महाराष्ट्रात मायबोली मराठी भाषेचा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अपमान हा नित्याचा झाला. मराठी प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देणं मराठी भाषेला नाकारणं हे राजरोसपणे महाराष्ट्रात घडतंय. यावर ना कोणाचा वचक आहे ना कोणाचा धाक.

त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन चालणार नाही तर मराठीच्या प्रत्यक्ष वापरासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com