पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी समर्थकांना संबोधित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ची मदत घेतली. एआयच्या माध्यमातून त्यांनी भाषण केलं. इंटरनेटमधील काही समस्यांमुळे इम्रान खानच्या छायाचित्रावर ऑडिओ चालवण्यात आला. दरम्यान पाकिस्तानच्या राजकारणात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या व्हिडिओला यु्ट्यूबवर १.४ मिलियन वेळा पाहण्यात आले. तर इतर सोशल मीडियावरही हजारो लोकांनी हे भाषण लाईव्ह पाहिलं. (Latest News)
आमच्या पक्षाला जाहीर सभा आयोजित करण्याची परवानगी नाही. तुम्ही नागरिकांनी सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केलं. लाइव्ह स्ट्रीमिंगमधील व्यत्ययावर बोलताना इम्रान खान म्हणाले की, आमच्या लोकांचे अपहरण केले जातंय. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय. दरम्यान लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये आलेल्या व्यत्ययावर पाकिस्तानच्या दूरसंचार नियामकाने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, व्यत्ययांची चौकशी केली जातेय.
इम्रान खान यांचे भाषण हे लिखित वर्जनसाठी तयार करण्यात आले होते. या भाषणाला तुरुंगातून लाईव्ह करण्याची मंजुरी मिळाली होती. इम्रान खान यांच्या पक्षाला जाहीर सभा घेण्यास परवानगी नसल्याने त्यांच्या पक्षाच्य कार्यकर्त्यांनी एआयचा वापर करत हे भाषण तयार केलं. इतकेच नाही तर इम्रान खान यांना मीडियावर ब्लॅक आउट करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान यांना ५ ऑगस्ट रोजी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.