Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अगं बाई काय हे! धावत्या लोकलच्या दरवाजात महिलेचा डान्स; व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ महिलेचा रील्स व्हिडिओ आहे,मात्र नक्की काय घडले ते एकदा पहा.

Tanvi Pol

Women Reels Video: सोशल मीडियाचा वापर सध्या प्रत्येक क्षेत्रात गेला जात आहे.अनेकांनी याचा फायदा स्वत:च्या प्रगतीसाठी गेला तर अनेकांनी मनोरंजनासाठी केला,मात्र सोशल मीडियाचा चुकीचा वापर बऱ्याच जणांच्या जीवाशी आलेला आहे.धोकादायक ठिकाणी रील्स करणं यासांरखे अनेक प्रकार दिसून आले.सध्या असाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातलेला आहे,ज्यात एका महिलेने धावत्या लोकलच्या दरवाजाला लटकून रील्स व्हिडिओ शूट केलेला आहे.

मुंबई लोकलचे(Mumbai Local) सोशल मीडियावर वारंवार अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात.व्हायरल व्हिडिओत बऱ्याचदा सीटच्या कारणांमुळे महिलांमध्ये जोरदार हाणामारी होते तर कधी लोकलच्या दरवाजात काही तरुणांची स्टंटबाजी पाहण्यास मिळते.लोकलमध्ये स्टंटबाजी करताना अनेकदा काहींनी जीव गमवावा लागला आहे तरी असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.सध्या व्हायरल होत असलेल्या महिलेनेही स्वता:चा जीव धोक्यात टाकून रील्स व्हिडिओ केलेला आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला,लोकल ट्रेनमधील महिलांचा विशेष डब्बा दिसत आहे.ज्या डब्ब्यात महिला प्रवाशांची मोठी गर्दी आहे,अशातच महिलांच्या डब्ब्यातील एक महिला चक्क लोकलच्या दरवाजाला असलेल्या खांबाला लटकते आणि रील्स बनवण्यास सुरुवात करते.व्हिडिओत ट्रेनचा वेगही अतिशय वेगवान आहे,मात्र कोणत्याही भितीशिवाय ती दरवाजात लटकलेली आहे.रील्स शूट करत महिला ट्रेनच्या आत प्रवेश करते आणि गर्दीतून वाट काढत रील्स बनवते.संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

लोकलमधील व्हिडिओ सध्या 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांना पाहण्यास मिळत असून ''nirmala__2318''या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे.या अकाउंटवर या महिलेचे अनेक रील्स व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे.सात दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...

महिलेचा लोकलमधील डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.ऐवढेच नाही तर नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेट केली आहे,''आमच्याच ट्रेन मध्ये लोक पुढे जागा आहे पुढे जा अस का बोलतात'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''धावत्या ट्रेनमधून काही बरे वाईट झाले असते..काय केले असते...''तर बऱ्याच यूजर्संनी दरवाजात रील्स बनवू नका असा सल्ला दिलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

Paithani Contrast Blouse: पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा? रेखीव लुकसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT