Teacher Student School Viral Video: SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Viral Teacher Video: शिक्षक असावेत तर असे! मित्रांच्या मदतीने आळशी विद्यार्थ्यांस उचलून आणले शाळेत,VIDEO व्हायरल

Teacher Student Viral Video: लहानपणी प्रत्येकाला शाळेत जाणं कंटाळवाणं वाटायचं. शाळेत जायचं नाव घेताच एक भिती वाटायची त्यामुळे लहानपणी शाळेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Teacher Student School Viral Video

लहानपणी प्रत्येकाला शाळेत जाणं कंटाळवाणं वाटायचं. शाळेत जायचं नाव घेताच एक भिती वाटायची त्यामुळे लहानपणी शाळेत न जाण्यामागे आपल्या सर्वांची वेगळी कारणं असायची. मात्र आजच्या स्थितीला शिक्षण पद्धती बदलली आहे. आपल्या लहानपणी मुले शाळेत जात नसत तेव्हा शाळेतील शिक्षक स्वत: घरी येऊन मुलाला शाळेत घेऊन जात असत. त्या शिक्षकासोबत आपले मित्रसुद्धा त्याच्यांसोबत असत. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक शिक्षक मुलाला त्याच्या घरातून उचलून शाळेत घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आपले जुने दिवस नक्कीच आठवले असतील.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय आहे व्हिडीओत...?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसत आहे की, एक मुलगा शाळेत जात नसल्याचे दिसत आहे. यानंतर शिक्षक चार मुलांना घेऊन त्यांच्या घरी पोहचतात. शाळेत जायच्या भितीने मुलगा इकडे-तिकडे लपून बसतो पण त्यानंतर कुटुंबातील सदस्य त्याला शोधून शिक्षकाच्या हवाली करतात. मग शिक्षक त्या मुलांना त्या विद्यार्थ्याला पकडायला सांगतात. चारही मुलं त्या विद्यार्थ्याला उचलून शाळेत घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसून येत आहे.

हा व्हिडीओ @ChapraZila या एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बिहारचा असल्याचे समजत आहे. गावातील व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा गमतीदार प्रकार कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर एका यूजरने लिहीलं आहे की,'आज हे घडतंय का??आमच्या काळात आम्हाला चांगलाच मार बसायचा' तर आणखी एका यूजरने लिहीलंय 'इतिहास साक्षी आहे की अशा प्रकारचे मित्र ही संधी कधीच सोडत नाही'. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूप मजेदार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT