Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भोss भोss.. हत्तीच्या अंगावर धावला कुत्रा, गजराजची सटकली, पुढे जे झालं ते पाहाच

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका गमतीदार गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात कुत्र्यासोबत एक छोटीशी गंमत झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली.

Tanvi Pol

Fuuny Video: सोशल मीडियावर कायम प्राण्यांच्या गमतीदार गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच सध्या असाच एक हत्ती आणि कुत्र्याच्या गंमतीदार गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात नक्की काय घडले ते पाहण्यासाठी एकदा व्हायरल व्हिडिओ पहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका परिसरात हत्ती (Elephant) येताना दिसत आहे. हत्तीच्या अचानक आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. नागरिक घराच्या दारातून हत्तीला पाहत आहेत, मात्र त्या परिसरात असलेले अनेक कुत्रे त्या हत्तीवर भुंकत असतात आणि हत्ती ते लांबून पाहत असतो, मात्र काही वेळानंतर हत्ती अचानक भुंकत असलेल्या कुत्र्याच्या दशिने पळतो आणि जो भुंकत असलेला कुत्रा नंतर तेथून पळ काढतो. संपूर्ण गमतीदार प्रसंग तेथील एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर सध्या पाहिला जात असून तो @susantananda3 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे आणि कधीचा आहे हे समजू शकलेले नाही,मात्र नेटकरी वर्गात मोठ्या प्रमाणात पसंतील आलेला अजूनही नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील काही यूजर्संनी कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''हत्ती २-३ सेकंद विचार करत होता,या कुत्र्याचं डोकं ठिकाण्यावर आहे का?''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''बापरे मस्त'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हत्ती आणि कुत्र्याच्या गंमतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT