Kerala Elephant Video: बापरे! गर्दी पाहून गजराज रागावले, व्यक्तीला उचलून हवेत भिरकावलं, Video Viral

Elephant Tossed Man In The Air: मलप्पुरम जिल्ह्यातील बीपी अंगडी मशिदीत वार्षिक उत्सवादरम्यान एका हत्तीने एकाला हवेत फेकल्याची घटना घडलीय.
Elephant Tossed Man In The Air
Elephant Viral Video
Published On

केरळातील एका फेस्टीव्हलदरम्यान हत्ती गजराज रागावल्याचं पाहायला मिळालं. रागावलेल्या हत्तीने गर्दीतील एका व्यक्तीला थेट हवेत भिरकावल्याची घटना घडलीय. केरळातील मल्लप्पुरम जिल्ह्यातील बीपी अंगाडी मशिदीच्या उत्सवादरम्यान ही घटना घडलीय. उत्सवाता हत्तींना सजवण्यात आले होते, त्यावेळी एक हत्ती पिसाळला त्याने गर्दीतील एका व्यक्तीला सोंडमध्ये पकडच हवेत फिरकावलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लप्पुरम येथील तिरूरमध्ये सकाळी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत २४ जण जखमी झालेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये पुथियांगडी उत्सवात सोन्याच्या पाट्यांनी सजलेले पाच हत्ती दिसत आहेत. गर्दीतील लोक त्यांचे शुटिंग करत आहेत. त्यादरम्यान एका हत्तीला त्याचा राग आला त्याने गर्दीतील एकाला हवेत भिरकावलं. हत्ती पिसाळल्याने लोकांची पळापळ झाली, यात अनेकजण जखमी झालेत.

मल्लप्पुरम येथील तिरूरमध्ये साडेबारा वाजता उत्सव साजरा केला जात होता. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान जखमी झालेला व्यक्तीला कोट्टक्कलच्या एमआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोथानूरहून मिरवणूक येताच हात्ती रागावला होता. उत्सवातील एक हत्ती अचानक चिडतो आणि जमावावर हल्ला चढवतो. त्यावेळी माहूत त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हत्ती गर्दीतील एकाला आपल्या सोंडमध्ये उचलतो आणि त्याला हवेत भिराकवून देतो. पिसाळलेल्या हत्तीचं नाव पक्कथु श्रीकुट्टन आहे.

पाक्कथु श्रीकुट्टन नावाच्या हत्तीलाही सजवण्यात आलं होतं. या उत्सवात पाच हत्तींना सजवण्यात आलं होतं, त्यापैकी पाक्कथु श्रीकुट्टन एक होता. उत्सव पाहण्यासाठी आलेले लोक सजवलेल्य्या हत्तीचा व्हिडिओ बनवत होते. पण त्याचदरम्यान एक हत्ती पिसाळला आणि त्याने एका व्यक्तीला सोंडाने उचललं आणि हवेत भिरकवलं.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, हत्तीने एका व्यक्तीला हवेत फेकल्यानंतर लोकांमध्ये दहशत पसरली. यानंतर कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. पिसाळलेल्या हात्तीवर माहूतने नियंत्रित केल्याने मोठा अनर्थ टळला. चेंगराचेंगरीच्या दरम्यान काही लोक जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com