Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वृद्ध व्यक्तीला एसटी बस चालकाची अरेरावी; VIDEO पाहून सोशल मीडियावर संतापाचा आगडोंब

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका बस चालकाचा आणि वयोरुद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले असेल ते एकदा पहा अन् काय पुढे घडले ते पाहून नेटकऱ्यांचा संपात होतोय.

Tanvi Pol

Viral Video: सध्या कुडाळ आगारातील एसटी बस चालकाने एका वृद्ध व्यक्तीशी अरेरावी केल्याच समोर आल आहे. सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.

घटनाक्रमाचा उलगडा

कुडाळ कवठी-परूळे मार्गावर प्रवास करताना रिकामी गाडी असताना प्रवाशांना गाडीत न घेताच गाडी पुढे नेण्याचा प्रकार या मुजोर चालकाने केला आहे. याचा व्हिडिओ(Video) सध्या व्हायरल झाला आहे. एका 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाला गाडी न थांबवता गाडी मागून धावायला लावल्याची व प्रवाशांशी अरेरावी केल्याची लेखी तक्रार एका गाडीतील प्रवाशाने कुडाळ एसटी आगार प्रमुखांकडे केली आहे. अशा मुजोर एसटी चालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कुडाळमधील संपूर्ण व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये नक्की काय घडले व्हिडिओत ते लिहिण्यात आलेले आहे ते असे की,''एसटी बस चालकाची वयस्कर व्यक्तीला अरेरावी''.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र त्यात नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''स्टॉप बंद करा आणि प्रत्येकाच्या दारात गाडी उभी करा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''एसटी ड्रायव्हर यांची लायसन रद्द करा'' तर,''याला निलंबित केलं पाहिजे आणि कारवाही पण व्हायला पाहिजे'',अशा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT