Small Kids Dance On Ganpati Bappa Song Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

Small Kids Dance On Ganpati Bappa Song: चिमुकल्यांनी पारंपारिक वेशभूषेत ‘बाप्पा येणार येणार’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

अवघ्या काही दिवसांवर घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी वाजत, गाजत मोठ्या भक्तिभावाने भक्त गणपती बाप्पाचे स्वागत करतात. गणपती बाप्पााच्या स्वागतासाठी चिमुकल्यांनी खास डान्स केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

'बाप्पा येणार येणार' या गाण्यावर लहान मुलांनी खास डान्स केला आहे. त्यांच्या या नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गणपती बाप्पा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सर्वानाच या सणाची मज्जा असते. पारंपारिक वेशभूषा लहान मुलांनी परिधान केली आहे. अत्यंत क्यूट अंदाजात ही मुले डान्स करताना दिसत आहे. लुक लुक डोळे अन् मोतुले कान, गणपती बाप्पा येणार असं या गाण्याचे बोल आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. चिमुकल्यांनी केलेल्या या डान्सचं गोड कौतुक केलं जात आहे. बालकलाकार गणेश केंद्रे याचं हे गाणं असून त्यावर या मुलांनी डान्स केला आहे. गणेश केंद्रे याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आमच्या पप्पांनी गणपती आणला हे देखील त्याचं गाणं तुफान व्हायरल झाले होते. गणेश केंद्रे याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Tax Reforms: मोठी बातमी! १२, २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द, जीएसटी प्रणालीतील बदलाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल

Maharashtra Live News Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीचं रौद्र रूप

Pune : ८२ कोटींची चोरी, कंपनी काढून डेटा विकला; हिंजवाडीतलं कांड कसं समोर आलं?

Vastu Tips: या वस्तू कोणाकडूनही फुकट घेऊ नका, अन्यथा वाढेल संकट

Kalyan Congress : कल्याण वासियांसाठी काँग्रेसची अनोखी स्पर्धा; बिनखड्ड्याचा रस्ता शोधणाऱ्यास ५ हजाराचे बक्षिस

SCROLL FOR NEXT