London Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

London Viral Video: लंडनच्या बसस्टॉपवर मुंबईच्या लोकलसारखी गर्दी; बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धक्काबुक्की;VIDEO VIRAL

London Bus Stop Viral Video: लंडनच्या बस स्टॉपवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे. ही गर्दी पाहून मुंबई लोकलचीच आठवण येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईची जान म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. लोकलमध्ये रोज प्रचंड गर्दी असते. रोज लाखो मुंबईकर रेल्वेने प्रवास करतात. संपूर्ण जगभरात सर्वात जास्त गर्दी फक्त मुंबई लोकलमध्ये पाहायला मिळते. परंतु आता अशीच गर्दी लंडनच्या बसमध्ये पाहायला मिळाली आहे. लंडनमध्ये बस पकडण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

युनायटेड किंगडममधील एका बस स्टॉपचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बस स्टॉपवर एका बसमध्ये घुसण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. खूप जास्त प्रवासी एकाचवेळी चढण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्दीत एकमेकांना धक्काबुक्की होताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत अनेक लोक एकाचवेळी बसमध्ये चढताना दिसत आहे. एकमेकांना धक्का देऊन बसमध्ये चढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. या सगळ्यात प्रवाशांची धक्काबुक्की होत आहे. हे पाहून ही बस नसून मुंबई लोकल असल्यासारखे दिसत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुईस्लिप या बसस्टॉपवरील हा व्हिडिओ आहे.

UB1UB2 या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'ही तर मुंबई लोकलसारखी गर्दी',' मुंबई लोकल २.०',लंडन की मुंबई हेच समजत नाही',अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT