Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: हवेतच विमानाला लागली आग, लँडिंग करतानाच थरारक व्हिडीओ आला समोर

Shocking Viral Video: सध्या विमानासंबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cargo Plane Viral Video

सध्या विमानासंबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसापूर्वीची विमानातून साप सापडल्याची घटना ताजी असतानाच आता अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका विमानाचा मोठा अपघात होता होता टळला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल झालेल्या विमानाच्या अपघाताचा व्हिडिओ अमेरिकेतील आहे. हे विमान बोईंग ७४७-८ विमान होते. या विमानास मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाला तातडीने आपत्काळीन लँडीग करावे लागले.कारण या विमानाला हवेतच आग लागली होती. हे विमान अॅटलस एअरचे कार्गो विमान होते.

संबंधित व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @timesofindia या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. धक्कादायक व्हिडिओ संबंधित घटनेच्या परिसरातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या आधीही आपण थरारक विमान अपघातांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले आहेत.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तसेच व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,'बोईंग अनेक चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच चर्चेत आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'मी सुरक्षित लँडिंगसाठी प्रार्थना करतो' अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT