Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

VIDEO: हिमाचलच्या बर्फाला मिरची पावडर अन् मीठाचा तडका; अशी थंडगार चटणी तुम्ही खाल्लीये का?

Food Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक व्हिडिओ पाहायल मिळतात. काही व्हिडिओ गंमतशीर असतात तर कधी आश्चर्यात पाडणारे असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Unique Food Trend Viral Video

सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक व्हिडिओ पाहायल मिळतात. काही व्हिडिओ गंमतशीर असतात तर कधी आश्चर्यात पाडणारे असतात.सोशल मीडिया एक प्रकारच्या व्हायरल व्हिडिओचा खजिनाच आहे असे म्हटंले तरी वावगं ठरणार नाही अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एक नवीन डिश आपल्याला पाहायल मिळते. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजपर्यंत आपल्यापैंकी लहानपणापासून एकदा तरी बर्फाचा गोळा नक्कीच खाल्ला असेल. या बर्फाच्या गोळ्याचे नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटते. बर्फाचा गोळा खाताना त्यावर कोण लाल रंगाचे गोड पाणी तर कोणी गोड सरबत टाकतो. मात्र तुम्ही कधी बर्फावर चिंचेची चटणी तसेच मीठ ,तिखट आणि साखर टाकून कसा बर्फ खाल्ला आहे का? पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणींनी ही नवीन बर्फाची डिश तयार केलेली आहे,सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुणी एका मोठ्या प्लेटमध्ये बर्फाचा गोळा ठेवते त्यानंतर बर्फाला ठेचून त्याचे तुकडे करते. यानंतर ती तरुणी त्यात चिंचेची चटणी ,तिखट तसेच मीठ आणि थोडी साखर टाकते. हे सर्व टाकल्यानंतर त्यात चांगले मिसळले जाते मग शेवटला एका लहान वाडग्यात टाकून चमच्याने खाते.

या डिशच्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @ruc.hhiiiiii या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडिओला ८६ हजारोंच्या घरात नेटकऱ्यांकडून लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा चाळीसगावात अपघात

Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday Horoscope: सुट्टीचा दिवस खर्चात जाणार, ५ राशींच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होणार; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT