Matar Peeling Machine Saam Tv
व्हायरल न्यूज

Juggad Viral Video: एकच नंबर!मटार सोलण्याची झंजट मिटली...बाजारात आलाय अनोखा जुगाड;VIDEO एकदा पहा

Matar Peeling Machine: बाजारात महिलांचे काम कमी होण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. बाजारात आता मटार सोलण्याचे नवीन मशीन आले आहे. या मशीनच्या साहाय्याने तुम्ही चुटकीसरशी मटार सोलू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Matar Peeling Machine Viral Video:

हिवाळ्यात बाजारात मटार जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. हिवाळ्यात घराघरात मटार पकोडे, मटार भाजी, मटार थालीपीठ असे अनेक पदार्थ बनवले जातात. हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी खूप जास्त मटार सोलावे लागतात. मटार सोलताना हात खूप जास्त दुखतात. तसेच एकाच जागी बसून पाठही दुखते. त्यामुळेच बाजारात आता मटार सोलण्याचे भारी मशीन आले आहे. या मशीनचा वापर करुन तुम्ही चुटकीसरशी मटार सोलू शकतात.

गृहिणींना रोज खूप कामे असतात. त्यात भाज्या स्वच्छ करणे, मटार सोलणे या कामांमुळे खूप त्रास होतो. त्यामुळेच बाजारात मटार सोलण्याचे नवीन मशीन आले आहे. या मशीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत मटार सोलण्याचे एक मशीन दिसत आहे. त्यामध्ये तुम्ही मटार टाकायचे. त्यानंतर एका बाजूला मटार तर दुसऱ्या बाजूला साल येते. त्यामुळे काम अगदी चुटकीसरशी होते. ही मशीन पांढऱ्या रंगाची आहे. या मशीनचा आकार लहान आहे. त्यामुळे ही मशीन ठेवण्यासाठी जास्त जागा लागणार नाही. या मशीनमध्ये एका बाजूला एक व्हिल दिले आहे. ते तुम्हाला फिरवावे लागणार आहे. या मशीनमध्ये एका बाजूने मटार घालायचे आहेत. त्यानंतर एका बाजूने साल आणि मटार वेगळे होतील. महिलांचे काम वाचवण्यासाठी ही मशीन खूप उत्तम आहे.

@outofdecor या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापेक्षा आमचा देसी जुगाड बरा, हे काम करायला खूप वेळ लागणार, अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT