भारत हा एकमेव देश आहे तिथे आपल्याला विविध संस्कृती पाहायल मिळते. त्यातीत राजस्थानची वेगळी अशी ओळख आपल्याला आहेच. राजस्थान अनेक कला संस्कृतींनी नेटलेला आहे. राजस्थानमध्ये दरदिवशी अनेक पर्यटक भेटी देत असतात. राजस्थानला जेव्हा पर्यटक येतो तेव्हा हमखास जयपूरलाही भेट देतो.त्यात जयपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात जयपूरमधील एका खाऱ्या पाण्याच्या सरोवराजवळून भारतीय रेल्वे जात आहे. या अद्भुत दिसणाऱ्या रेल्वेचा प्रवासा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जयपूरमध्ये ही अनेक पर्यटन स्थळ आहेत, त्यातच जयपूरमध्ये भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.जे सांभर सरोवर या नावाने ओळखले जाते.याच सरोवराजवळून भारतीय रेल्वे धावताना दिसत आहे.दरम्यान केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांभर सरोवराजवळून धावणाऱ्या रेल्वेचा एक सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक रेल्वे मार्ग दिसत आहे. या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला मिठागर आहे. त्यातच भारतीय रेल्वे धावताना दिसत आहे. हे सर्व दृश्य अतिशय विलोभनीय असे दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @AshwiniVaishnaw केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. याआधीही केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे असे अनेक मनोरंजक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.व्हायरल झालेला व्हिडिओ ट्रॅव्हल फोटग्राफर राज मोहन यांनी शूट केला आहे. व्हिडिओ शेअर करत व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'भारतातील सर्वात मोठ्या अंतर्देशीय मीठ तलावावरील निसर्गरम्य रेल्वे प्रवास'.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,'मस्तच..यापूर्वी असं काही पाहिले नव्हतं',तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'प्रवास करण्यासाठी सुंदर ठिकाण' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,' हे आपल्या देशातच असं दिसू शकतं'.व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.