Daughter Crying For Father saam tv
व्हायरल न्यूज

Viral video: आई सांगत होती ना, दारू पिऊ नका...; दिवंगत वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून मुलीची विचारणा, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

Daughter Crying For Father: एका लहान मुलीचा तिच्या दिवंगत वडिलांबद्दलचा भावनिक संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने लाखो युजर्सना भावुक करून पालकत्व आणि जबाबदारीवर विचार करायला भाग पाडलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, पण काही व्हिडिओ मनाला स्पर्श करून जातात. सध्या इंस्टाग्रामवर असा एक भावनिक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. ज्यामध्ये एका लहान मुलीचा आपल्या दिवंगत वडिलांशी असलेला निरागस संवाद पाहून लाखो युजर्स भावुक झालेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील is58163 या अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी आपल्या वडिलांची फोटो फ्रेम पाहतेय. तिच्या डोळ्यांसमोर ही फ्रेम आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर निरागसता आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतंय.

व्हिडिओमध्ये मुलगी फोटोला बोट दाखवत आपल्या वडिलांना जणू प्रश्न विचारत म्हणते, “आई म्हणायची ना दारू पिऊ नका… तुम्ही का ऐकलं नाही? सगळ्यांचे पप्पा आहेत, मात्र तुम्ही नाही आहात... तुम्ही दारू पिऊन का गेलात? सांगा मला… नाहीतर मी रागावेन.” तिच्या या शब्दांमागे कोणताही राग नसून, वडिलांना परत मिळवण्याची एक निष्पाप आस आहे. तिला अजून पूर्णपणे समजलेलं नाही की तिचे वडील आता परत येणार नाहीत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आतापर्यंत याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. तसंच सुमारे 5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडिओवर आल्यात. अनेक युजर्सनी या मुलीच्या भावनिक अवस्थेवर सहानुभूती व्यक्त केली आहे.

एका युजरने लिहिलंय, “आजपासून मी दारू पूर्णपणे सोडली आहे. माझी मुलगीही असंच म्हणते, मी आता तिला कधीच दुखावणार नाही.” तर दुसऱ्या युजरने कमेंट केली, “या व्हिडिओने मला खरोखर विचार करायला भाग पाडलंय. मुलांसाठी आपण किती जबाबदार असायला हवं, हे पुन्हा जाणवले.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT