Shivkalin Art Viral Video एोोस ऊन
व्हायरल न्यूज

Shivkalin Art Viral Video: नऊवारी अन् लाठीकाठी; मराठमोळ्या वाघिणीचा अस्सल मर्दानी खेळ, VIDEO व्हायरल

Girl Play Shivkalin Arts Video: महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची घराघरात पूजा केली जाते. शिवाजी महाराजांच्या काळात तलवारबाजी, लाठी- काठी असे खेळ खेळले जायचे. परंतु सध्या हे खेळ खेळताना कोणीही दिसत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाते. महाराष्ट्रात घराघरात शिवाजी महाराजांचे पूजन केले जाते. शिवाजी महाराजांच्या काळात अनेक खेळ खेळले जायचे. त्यांच्या काळात तलवारबाजी, लाठी- काठी असे अनेक खेळ खेळले जायचे. हे खेळ खेळताना समोरच्या व्यक्तीला कधीही दुखापत होऊ शकते. परंतु याच गोष्टींचे भान ठेवून अचूक ठिकाणी आपली लाठी चालवणे हेच कौशल्य असते. परंतु सध्या असे खेळ खेळताना कोणीच दिसत नाही. परंतु सोशल मीडियावर नुकताच लाठी- काठी खेळणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लाठी- काठी खेळताना समोर जो व्यक्ती उभा असतो. त्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे शक्यतो लाठी- काठी खेळताना कोणीच उभे राहत नाही. परंतु एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत त्या मुलगी लाठी- काठीचा खेळ खूप उत्तम पद्धतीने खेळताना दिसत आहे. तिने तिच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला ही काठी बिल्कुल लागून दिलेली नाही. समोरचा व्यक्तीदेखील घाबरलेला दिसत नाहीये. त्यांचा या मुलीवर खूप विश्वास आहे. त्यामुळेच लाठी अगदी तोंडाजवळ आली तरी तो व्यक्ती मागे फिरत नाही. या मुलीने लाठी- काठी खेळून झाल्यानंतर ती त्या व्यक्तीच्या पाया पडते. त्यावरुन हा व्यक्ती तिचा गुरु असू शकतो. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

gabbar_singh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर 'शिवरायांच्या काळात जो विश्वास मावळ्यांवर होता तोच विश्वास आजही टिकून आहे', असं कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT