सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतोय. ते पाहुन प्रत्येक व्यक्तीची छाती स्वाभिनान भरून आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओत आपल्याला आजच्या तरूणाईत भिडलेला शिवकालीन युध्दकलेचा आविष्कार पाहायला मिळतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहु शकता की, हा व्हिडीओ एका मोकळ्या मैदानावरील आहे. या मैदानात तरूण-तरूणी दिसत आहेत. मैदानावर शिवकालीन युध्दकला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत मुलांनी बाराबंदी , धोतर आणि बंडी परिधान असा पारंपारिक पोशाख परिधान केलाय आणि मुलींनी भगव्या रंगाच्या साड्या नेसल्या आहेत ,तसंच कपाळावर चंद्रकोर लावल्या आहेत. यामुळं सर्वांचेच लक्ष वेधले गेलं होतं. भिरभिरणारी काठी, पट्यांचे वेगवान वार अन आवेशान केलेल्या लढती या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
@PatilSunilSakalया ट्वीटर काउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोल्हापुरातील आहे. हलगी, घुसकं आणि कैताळाचा ठेका सुरू झाल्यानतंर मैदानात उत्साह पसरला. चपळाईने होणाऱ्या त्यांच्या हालचाली, कुठल्याही कोनात वळणारी त्यांची शरीरं हा तो आविष्कार तना-मनाला जखडून टाकतो. ही शिवकालीन युध्दकलेला हजार वर्षांची परंपरा आहे पण आजही जशीच्या तशी जपलेली आहे.
शिवकालीन युध्दकालेचा व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला काही मिनीटांतच हजाराच्या घरात व्ह्यूव्ज आलेत. यावर काही यु्र्जरंन म्हटल आहे की, ही परंपरा कधीच कळाच्या ओघात हरवायला नको. अनेकांनी या तरूणांचे कौतुक केलयं. काही यु्र्जरंन बाकीच्या तरूणांना याचां आदर्श घेण्यास सागिंतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.