Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाप्पा निघाले गावाला… लाडक्या गणरायाला निरोप देताना चिमुकला भावूक, विसर्जनानंतर हुंदके देत रडला; पाहा भावनिक VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दहा दिवस लाडक्या बाप्पाच्या वास्तव्याने घरातील सर्वच जण त्याच्या आराधानेत रमून जातात. घरातील बच्चे कंपनीला तर बाप्पाचा एवढा लळा लागतो की, ते देह भान विसरून गणरायाच्या सानिध्यात रमतात. मात्र विसर्जनाच्या वेळी सर्वच जण जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतात. नाशिकच्या कळवणमध्ये पगार कुटुंबीयांनी बाप्पाचे नदीत विसर्जन केल्यानंतर गणरायाला निरोप देतांना एक चिमुकला भावुक झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक चिमुकला त्याच्या वडील आणि बहीणीसह पाण्याच्या एका ओढ्यात उभा आहे. वडिल्यांच्या हातात लहानशी गणरायाची मूर्ती (idol) आहे जी ती पाण्यात विसर्जनासाठी आणली आहे. मात्र विसर्जनावेळी वडीलांच्या हाताला चिमुकल्याने पकडले आहे त्यानंतर काही वेळात ते मूर्ती विसर्जन (visarjan) करतात. मात्र गणपतीची मूर्ती विसर्जन केल्यानंतर चिमुकला रडण्यास सुरुवात करतो, मात्र चिमुकल्याला त्याची आई विचारताना दिसते काय झाले तेव्हा तो गणपती बाप्पा गेल्याचे सांगत आहे. संपूर्ण व्हिडिओ (Video) तेथिल एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील आहे. जिथे पगार कुटुंबातील स्वराज पगार या चिमुकला गणरायाचे विसर्जन करताना भावुक झालेला दिसून आला. सध्या सोशल मीडियावर चिमुकल्याच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला ''@SaamTV''या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' कोंडस मुलगा आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच व्हिडिओ'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

आणखी एक चिमुकला झाला भावूक

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT