Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चोराच्या उलट्या बोंबा! नवऱ्याने रंगेहात पकडलं, बायकोने प्रियकरासोबत त्याला रस्त्यावर चोपलं

Fighting Video: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या व्हायरल होत असलेल व्हिडिओ काहीसा हटके आहे, ज्यात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या नवऱ्याला जोरदार हाणले आहे.

Tanvi Pol

Woman Beats Her Husband: लग्न म्हटलं की प्रेम शिवाय विश्वास या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र, काही नाती इतकी गुंतागुंतीची असतात की, त्यात कोणाचा विश्वासघात, कोणाची फसवणूक आणि कोणाची कधी धुलाई होईल सांगता येत नाही. सध्या असाच एक भन्नाट प्रकार समोर आला आहे, जिथे एका नवऱ्याने आपल्या बायकोला प्रियकरासोबत रस्त्यावर रंगेहात पकडलं, मात्र नवऱ्याची रस्त्यावर धुलाई झाली आहे.

उलट नवऱ्यालाच शिक्षा!

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला, एक महिला तिच्या पतीला मारताना दिसत आहे. अक्षरश: त्या व्यक्तीचे केस पकडून त्याला जमिनीवर झोपवून त्याला मारत आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेचा प्रियकरही त्या व्यक्तीला मारत असतो. ज्या व्यक्तीला ती मारत आहे तो व्यक्ती तिचा पती आहे. हा वाद इतका टोकाला जातो की, महिलेचा प्रियकर आणि महिलेच्या पतीमध्ये रस्त्यावर जोरदार हाणामारी होत आहे. सर्व प्रकार रस्त्यावरील व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

हा व्हिडिओ @WeUttarPradesh या एक्स सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून फेसबूक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून लाईक्स आणि व्ह्यूज या घटनेला मिळालेल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल झाले आहे, मात्र हा व्हिडिओ पाहिल्यांतर नेटकरीही अवाक् झालेले आहेत.

हा व्हिडिओ (Video) इतका व्हायरल झाला की लाईक्स नाही तर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट केली,''या जगात आता काहीही होऊ शकत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''न्याय मिळाला पाहिजे नवऱ्याला'' तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT