Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्याच्या मधोमध महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा; व्हायरल VIDEO पाहून लोक हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियावर वारंवार काहीना काही हटके प्रकार पाहण्यासाठी मिळत असतात. त्यातच पुन्हा एकदा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Lucknow Street Drama: लखनऊच्या रस्त्यावर एक विचित्र घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसत असून तब्बल २० ते ३० मिनिटे विचित्र हरकती करताना दिसली. या घटनेमुळे स्थानिक नागरिक तसेच वाहतूक पोलिसही मोठ्या प्रमाणात हैराण झाले.

काय आहे प्रकरण?

व्हायरल(Viral) होत असलेला सर्व प्रकार लखनऊ शहरात घडला असून त्या व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल, एक महिला अचानक येते आणि रस्त्याच्या मधोमध बसते आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वत:चे डोके गरागर फिरवू लागते. सुरुवातील काही नागरिक तिच्याकडे दुर्लक्ष करतात, पण काही वेळाने महिलेच्या अशा हरकतीमुळे पाहता पाहता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते.

वाहतूक कोंडी आणि गोंधळ

रस्त्याच्या मधोमध बसलेल्या महिलेच्या या वागण्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. काही नागरिक महिलेला तेथून जाण्यास सांगत होते, मात्र ती काहीही ऐकत नसल्याचे व्हिडिओत दिसते. सध्या हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@News1IndiaTweet'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स केलेले आहे.

लखनऊमधील ही घटना (Incident)सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे शिवाय लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी लिहिले,'' रोज नवीन प्रकार पाहण्यासाठी मिळत आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मानसिक स्थिती ठिक दिसत नाही तिची'' तर काहींनी,''प्रसिद्धीसाठी केले असेल'', अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT