Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्नात स्टंटबाजी पडली महागात!नाचता नाचता लावली आग, पाहुण्यांची पळापळ; VIDEO व्हायरल

Dancing Fire Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात आनंददायी लग्न सोहळ्यात नक्की असे काय घडते ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेले आहे.

Tanvi Pol

Shocking Viral News: लग्नाची मिरवणूक कायमच आकर्षणाची गोष्ट असते कारण त्यात डीजेच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी असतात.काही असे असतात ज्यांचा वरातीतील डान्स पाहतच राहावे असे वाटते तर काहीजण त्यांच्या मजेशीर अंदाजाने सर्व लग्नाचा कार्यक्रम खास बनवतात,त्यात सध्या एका लग्नाच्या वरातीतील एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होत असलेल्या वरातीत अनेक वऱ्हाडी आहेत,जे गाण्यावर डान्स करत असतात,मात्र त्याकील एका तरुणाने रस्त्याकडेला असलेला एक गवताचा मोठा पेंढा उचलतो आणि त्याला आग लावली,त्यानंतर तो आग लावलेल्या गवताता पेंढा घेऊन संपूर्ण वरातीत नाचू लागतो.मात्र तरुणाच्या या धोकादायक(Shocking) स्टंटमुळे संपूर्ण वरारीत गोंधळ उडाला होता.सर्वजण घाबरुन तेथून पळ काढू लागले.

वरातीतील हा व्हिडिओ your___memer या अकाउंटवर सध्या व्हायरल(Viral) होत आहे.आतापर्यंत या व्हिडिओला लाखो नेटकरी वर्गाने पाहिला आहे आणि हजारो यूजर्संनी त्याला लाईक केले आहे.शिवाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्संनी मजेशीर तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

एका यूजरने कमेंट केली आहे,''नाद खुळा'' तर काहींनी कमेंट केली आहे,''अशाना विचार करुन लग्नात बोलवा''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''मला वाटलं होतं की तो ते फिरवेल आणि वरावर फेकेल''तर अशा गंमतीदारही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : नवी मुंबई हादरली! हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या तरुणीने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा संकट; सलग ३ दिवस पाऊस कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार?

Maharashtra Live News Update: परभणीत जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? VIDEO

Blood Transfusion: शरीरात चुकीच्या 'ब्लड ग्रुप'चे रक्त चढवल्यास काय होते?

SCROLL FOR NEXT