उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लखनऊमधील खुर्रम नगरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाईकवरुन जात असणाऱ्या तरुणाला एक तरुण चपलेने मारताना दिसत आहे. मागील एका बाईकस्वाराने हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. (Viral Video)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १९ मे रोजी घटली आहे. या व्हिडिओत एक मुलगा आणि मुलगी बाईकवरुन जाताना दिसत आहेत. बाईकवरुन जाताना अचानक मागे बसलेली मुलगी हातात चप्पल घेते अन् बाईकस्वार मुलाला मारायला लागते. ती त्याला खूप मारते.
व्हायरल व्हिडिओतील मुलगी बाईकस्वाराला १४ सेकंदात २० वेळा चप्पलेने मारताना दिसत आहे. बाईकवरुन जात असलेला मुलगादेखील तिला काहीच बोलताना दिसत नाहीये. उलट तो बाईकदेखील थांबवत नाहीये. दोघेही बाईकवरुन जात असताना भांडताना आणि मारताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील ही मुलगी खूप जास्त रागात दिसत आहे. ती रागाच्या भरात मुलाला अपशब्द बोलतानादेखील दिसत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिस या बाईकचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांना या बाईकस्वाराचा शोध घेणे कठीण जात आहे. पोलिस अजून तपास करत आहेत.
सोशल मीडियावर रोज असे हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात मुलींची हाणामारी किंवा बाईकवर जाताना रोमान्स करताना अनेकजण दिसतात. परंतु बाईकवर जर अशा पद्धतीने कोणी कोणाला मारत असेल तर कदाचित अपघात होऊ शकतो. बाईकस्वाराचा तोल जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.