Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: १५ वर्षांनंतर बाप-लेकाची भेट.. VIDEO पाहताच प्रत्येकजण होईल भावनिक

Viral News: सोशल मीडियावर एका बाप-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहून प्रत्येक नेटकऱ्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Father-Son Viral Video:

सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत कधी भंयकर अपघांताचे धडकी भरणारे व्हिडिओ असतात तर कधी मस्ती करणाऱ्या प्राण्यांचे व्हिडिओ असतात. परंतू सोशल मीडियावर काही प्रमाणात असेही व्हिडिओ असतात ते पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अशातच सोशल मीडियावर एका बाप-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहून प्रत्येक नेटकऱ्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की, एका घरातील रूमच्या बाहेरील गॅलरीत एक काळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरूण पांढऱ्या खुर्चीवर बसलेला आहे. तरूणाच्या पाठीमागून त्याचे वडिल बाहेर कोण बसलेले आहे ते पाहण्यासाठी येतात. वडिल जेव्हा मुलाला पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला दिसत आहे. परंतू मुलगा वडिलांना पाहतच राहतो. तेवढ्यात तिथे त्यांची आईही येते अन् मुलाला मिठी मारते. शेवटला मुलगा आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारतो आणि रडायला लागतो.

व्हायरल व्हिडिओ हा@crazyclipsonly या एक्स (ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. नेमकाहा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकल नाही. घरात उपस्थित असलेल्या व्यक्तीनेहा क्षण आपल्या मोबाईमध्ये कैद केलाय.

बाप-लेकाच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आले असून लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नेटकऱ्यांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला अनेक सोशल साईटवर शेअरही केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षकांच्या वेतनात बदल, साताऱ्यात होणार IT पार्क; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Smartphone 2026: 6500mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर; दमदार फिचर्ससह Motorola Edge 70 Pro लाँच, किंमत वाचा

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

SCROLL FOR NEXT