Alandi Bandh : ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ, हजाराे वारकरी आळंदीत; बंदच्या पार्श्वभूमीवर पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त (पाहा व्हिडिओ)

11 डिसेंबरला संजीवन समाधी दिनाचा मुख्य सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
alandi bandh today
alandi bandh todaysaam tv
Published On

- गाेपाल माेटघरे / अक्षय बडवे

Alandi News :

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा (sant dnyaneshwar sanjeevan samadhi sohala) आणि तिर्थक्षेत्र आळंदीतील कार्तिकी वारीला (kartiki wari) आजपासून (मंगळवार) सुरवात होत आहे. या निमित्त राज्यातील असंख्य वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. दरम्यान आळंदी बंदच्या (alandi bandh) पार्श्वभूमीवर वारक-यांना काेणत्याही सुविधांपासून वंचित राहावे लागणार नाही असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. (Maharashtra News)

आज पहाटे माऊलीच्या समाधीला पवमान अभिषेक घातल्या नंतर पंचारती करण्यात आली. त्यानंतर गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरी पूजनाने या सोहळ्याला सुरवात हाेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच 11 डिसेंबरला संजीवन समाधी दिनाचा मुख्य सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

alandi bandh today
Success Story: दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी; करमाळ्यातील इंजिनिअर युवकानं करुन दाखवलं

आज आळंदी बंद

दरम्यान विश्वस्त निवडीत स्थानिकांना डावलल्याने आज ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. त्याची सुरुवात गुरुवर्य हैबतराव बाबा यांच्या पायरी पूजनानंतर होणार आहे अशी माहिती आळंदी बंदल आंदोलनाचे मुख्य नेतृत्व करणारे ग्रामस्थ डी.डी. भोसले यांनी दिली. आळंदी बंद मुळे आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी देखील आम्ही घेतली आहे असा दावा देखील भोसले यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

उद्यापासून पीएमपीच्या ३४२ जादा बसेस

कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त श्री क्षेत्र आळंदीयात्रेसाठी पीएमपी प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. येत्या ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान या कालावधी करिता मार्गावरील ११३ व जादा २२९ सर्व मिळून ३४२ बसेस सोडण्यात येणार आहेत. तर ८ ते ११ डिसेंबर् या कालावधीत रात्रीच्या वेळी गरजेनुसारही बसेस सोडण्यात येणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

alandi bandh today
Mathadi Kamgar Sanghatna: घाई गडबडीत माथाडी कामगार विधेयक मंजूर करु नये, 14 डिसेंबरला माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद : नरेंद्र पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com