Dog vs Leopard Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'कधीच कोणाला कमी समजू नका' कुत्र्यानं चढवला बिबट्यावर हल्ला, २०० मीटर फरफटत नेलं अन्...

Dog vs Leopard Viral Video : नाशिकच्या निफाड तालुक्यात कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला. व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्र्याने बिबट्याला ३०० मीटर फरफटत नेल्याचे दृश्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर बिबट्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ग्रामीण भागात मानवी वस्तीत बिबटे हमखास पाहायला मिळतात. अनेकदा बिबट्याने मानवी वस्तीवर हल्ला केला असल्याचे व्हिडीओ देखील समोर येतात. मात्र सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यामध्ये कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला आहे.

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर परिसरात हा ही घटना घडली आहे. एका कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुत्रा हा बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्नात होता. सुरूवातीला बिबट्याला वाटलं की आपण सहज कुत्र्याची शिकार करू शकतो पण डाव पलटताना दिसतो आहे. कुत्र्याने बिबट्याच्या तोडांशी पकड घट्ट ठेवत त्याला ३०० मीटर फरफटत नेलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्यावेळी ही संपूर्ण घटना घडली आहे. दरम्यान गावकऱ्यांनी प्लॅश लाईट मारून हा व्हिडीओ काढला आहे.बिबट्या हा कुत्र्याच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे.पुढे कुत्र्याने पकड सैल करताच बिबट्याने धूम ठोकलेली दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण, जेलवारी करूनही अग्रवाल कुटुंबीयांचा माज उतरला नाही; धक्कादायक VIDEO चर्चेत

Thursday Horoscope: स्वामींच्या कृपेने अडथळे दूर होणार! ५ राशींना कामाच्या नव्या संधी मिळणार

Maharashtra News Live Update: पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात अमरावतीत युवक काँग्रेसचे आंदोलन मेलोडी चॉकलेट वाटून मोदी सरकारचा निषेध

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा

Fort In Raigad : शत्रूंना कायम आव्हान देणारा जलदुर्ग; समुद्राच्या लाटांमध्ये दडलाय राजेशाही इतिहास, सुट्ट्यांमध्ये 'हा' किल्ला पाहाच

SCROLL FOR NEXT